मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रंगभूमी गाजवणारे अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्यक्षेत्रातील नावाजलेला पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून होत आहे कौतुक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 17, 2023 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishnudas Bhave Medal Award announced to Prashant Damle

रंगभूमी गाजवणारे अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्यक्षेत्रातील नावाजलेला पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून होत आहे कौतुक

मराठी रंगभूमीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी स्वतःला रंगभूमीला वाहून घेतले असून आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्रशांत दामले यांनी आतापर्यंत सुमारे ३२ नाटकांचे तब्बल १२ हजार पाचशेंहून अधिक प्रयोग करत जागतिक विक्रम रचला आहे. त्यामुळेच त्यांना रंगभूमीतील विक्रमवीर अभिनेते म्हणूनही ओळखले जाते. केवळ अभिनयच नाही, तर नाट्य निर्मितीक्षेत्रातही आपलं नशीब अजमावत आहे. त्यांच्या बॅनरअंतर्गत बनलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘नियम व अटी लागू’ यांसारख्या नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. (Vishnudas Bhave Medal Award announced to Prashant Damle)

रंगभूमीतील त्यांच्या या योगदानाबद्दल आतापर्यंत संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यात आता आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर यांच्या वतीने देण्यात येणारा मराठी रंगभूमीतील सर्वात प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पदक पुरस्कार यावर्षी अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी त्यांच्या नावाची घोषणा होताच चाहत्यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा – “आता घर, आपली माणसं आणि…”, अमेरिकेमध्ये राहिलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला भारतात परतण्याचे वेध, म्हणाली, “मायदेशी…”

View this post on Instagram

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

१९८३ मध्ये ‘टूरटूर’ या नाटकातून प्रशांत दामले यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘मोरूची मावशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे चार’, ‘शूSS कुठे बोलायचं नाही’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘कार्टी काळजात घुसली’ यांसारखी अनेक नाटक केली आहेत. सध्या त्यांचं ‘सारखं काहीतरी होतंय’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर सुरु आहेत. केवळ अभिनेते नव्हे, तर गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते यांसारख्या भूमिकेमधून त्यांनी रंगभूमीवर एक वेगळीच छाप पाडली आहे. त्याचबरोबर, अनेक चित्रपट व मालिकांमध्येदेखील ते झळकलेले आहेत.

हे देखील वाचा – डोळा व चेहरा सुजला अन्…; अमेरिकेमध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झाली बिकट अवस्था, म्हणाला, “डॉक्टर होते पण…”

प्रशांत यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं असून त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. तसेच, ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपददेखील भूषवत आहे. प्रशांत यांनी विविध नाटकांमधून अनेक भूमिका साकारल्या असून त्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अश्या या दिग्गज अभिनेत्याला विष्णुदास भावे पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना व नाट्यप्रेमींना आनंद झाला आहे.

Tags: marathi natakprashant damlerangbhumiVishnudas Bhave Medal Award
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
supriya pathare struggle

१८ घरांची धुणी-भांडी करायच्या सुप्रिया पाठारे, रस्त्यावर बसून अंडीही विकली, म्हणालेल्या, “लोकांच्या घरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.