शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील दयाबेन आता दिसते अशी, तब्बल पाच वर्षांनंतर कुटुंबासह दिसली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2023 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Disha Vakani Video

'तारक मेहता…'मधील दयाबेन आता दिसते अशी, तब्बल पाच वर्षांनंतर कुटुंबासह दिसली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या विनोदी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. दिशाने या मालिकेत ​​’दयाबेन’ ही भूमिका अत्यंत चोख पार पाडली. दयाबेन हे पात्र मनोरंजन उद्योगातील सर्वात लोकप्रिय पात्र आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमाला निरोप देऊनही दिशाचं दयाबेन हे पात्र लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. विशेषतः दिशाच्या चाहत्यांना मालिकेतील तिचा विनोद आणि तिच्या जबरदस्त अशा गरबा मूव्हची आठवण येत आहे यांत शंका नाही. (Disha Vakani Video)

मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर दिशा पुन्हा एकदा मालिकेत परतणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र दिशा काही मालिकेत परतली नाही. लग्नानंतर, या अभिनेत्रीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि ती तब्बल ६ वर्ष सिनेसृष्टीपासून दूर गेली. इतकंच नव्हे तर ती सोशल मीडियापासूनही दूर राहिली. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी दिशा वकानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता नवरात्र सुरू असल्यानिमित्ताने दिशाने पती व मुलांबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान या कार्यक्रमामधील त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

आणखी वाचा – मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झालेल्या शेरिका डी अरमासचं निधन, २६व्या वर्षी कर्करोगाशी सुरु असलेली लढाई ठरली अपयशी

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

या व्हिडिओमध्ये, दिशा तिचा पती मयूर पडियासह नवरात्रीच्या कार्यक्रमात त्यांच्या मुलांसह पाहायला मिळाली. या कार्यक्रमासाठी दिशाने गोल्डन रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यावर गुलाबी रंगाची नक्षीदार ओढणी व ब्लाऊज परिधान केला होता. अगदी कमी मेकअप करून तिने केस मोकळे सोडले होते. तसेच दिशाचा पती मयूरने लहान मुलाला कडेवर घेतलं होतं. मयूरने शेरवानी घातली होती. दिशाने पती व मुलांबरोबर देवीचे दर्शन घेतले. दरम्यान दिशा व मयूर दोघेही त्यांच्या मुलांची काळजी घेताना दिसले. दिशाचा नवरा मयूरने त्यांच्या छोट्या मुलाला कडेवर उचलून घेतलं होतं. पिवळ्या रंगाच्या पोशाखात त्यांचा लेक गोंडस दिसत होता. दिशांच्या मुलाची पहिल्यांदाच झलक पाहायला मिळाली.

आणखी वाचा – ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडणार, केव्हा व कुठे पाहता येणार?, आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, एसएस राजामौली, करण जोहर यांचा समावेश

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

तर आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दिशा तिच्या पती आणि त्यांच्या मुलांसह कार्यक्रमात आरती करताना दिसली. दिशा वकानी आणि तिचा पती, मयूर पडिया यांनी २०१५ साली लगीनगाठ बांधली. त्यानंतर दिशाने दोन वर्ष काम केलं. मात्र पालक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिशाने सिनेसृष्टीपासून काढता पाय घेतला.

Tags: disha vakanidisha vakani husbanddisha vakani kidsentertainmenttarak mehta ka ulta chashma
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Atul Todankar Infected

डोळा व चेहरा सुजला अन्…; अमेरिकेमध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झाली बिकट अवस्था, म्हणाला, “डॉक्टर होते पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.