शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डॉ. मनमोहन सिंग यांच्या बायोपिकचा वाद पेटला, अनुपम खेर व हंसल मेहतांनी एकमेकांना म्हंटलं ढोंगी, प्रकरण नक्की काय?

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 28, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
anupam kher on hansal mehta

अनुपम खेर व हंसल मेहता यांच्यामध्ये शाब्दिक वाद

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी संध्याकाळीवयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. अभिनेते अनुपम य खेर यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली. अशातच आता ट्विटरवर एक युद्ध सुरु झाले आहे,मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट भेटीस आला होता. यावरुन यावरुन अभिनेते अनुपम व चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत. नक्की काय झालं? ते जाणून घेऊया. (anupam kher on hansal mehta)

पत्रकार व लेखक वीर संघवी यांच्या पोस्टकडे लक्ष वेधले गेले. शुक्रवारी त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “जर तुम्ही मनमोहन सिंह यांच्याबद्दल बोलले गेलेलं खोटं जाणून घ्यायचं असेल की ‘द ॲक्सिडेंटल…’ चित्रपट पुन्हा बघितला पाहिजे. हा एक खराब चित्रपटच नाही तर मीडियाचा वापर करुन चांगल्या व्यक्तीचे नाव खराब कसे करावे? याचे एक उत्तम उदाहरण आहे”. वीर यांची ही पोस्ट हंसल यांनी रि-ट्विट केले आणि १०० टक्के असे लिहिले. यावर अनुपम खेर यांनी भलामोठा रिप्लाय केला आहे.

आणखी वाचा – “हफ्ते परवडत नाहीत म्हणून…”, गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “बघत राहा की…”

+100 https://t.co/e93gJcfb3N

— Hansal Mehta (@mehtahansal) December 27, 2024

अनुपम यांनी लिहिले की, “यामध्ये वीर संघवी ढोंगी नाहीत. कोणताही चित्रपट न आवडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हंसल तर ‘द ॲक्सिडेंटल…’ चित्रपटाचे क्रिएटीव्ह हेड आहेत. ते इंग्लंडमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हजर होते.  त्यांनी क्रिएटीव्ह इनपुट दिले आहेत आणि त्याची फीदेखील घेतली असेल. त्यामुळे वीर संघवी यांच्या प्रतिक्रियेवर १००% म्हणणं खूपच वेगळं वाटत आहे”.

आणखी वाचा – रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीची अनुष्का-विराटच्या मुलांशी तुलना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ना अहंकार…”

The HYPOCRITE in this thread is NOT @virsanghvi. He has the freedom to not like a film. But @mehtahansal was the #CreativeDirector of #TheAccidentalPrimeMinister. Who was present at the entire shoot of the film in England! Giving his creative inputs and must have taken the fee… https://t.co/tkr3H1ChyX

— Anupam Kher (@AnupamPKher) December 27, 2024

पुढे ते म्हणाले की, “मी वीर संघवीशी सहमत आहे असं नाही. पण आम्ही चुकीचं काम करु शकतो. पण हे स्वीकारलं पाहिजे. हंसल मेहता यांच्या प्रमाणे काही निवडक लोकांकडून शाबासकी मिळवू नये. हंसल मेहता… मोठे व्हा!!! माझ्याकडे अजूनही चित्रिकरणाचे काही फोटो व व्हिडीओ आहेत ज्यामध्ये आपण एकत्र आहोत”. दरम्यान अनुपम यांच्या पोस्टवरदेखील हंसल यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “अनुपम सर मी माझ्या चुका स्वीकारत आहे. मी माझे काम चोख करतो. तुम्ही मला काहीही बोलू शकता. जर मी चुकून तुम्हाला दु:ख पोहोचवलं असेल तर त्यासाठी क्षमा करा. याबद्दल आपण भेटून चर्चा करु आणि सगळे गैरसमज दूर करु”. दरम्यान या शाब्दिक युद्धावर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Tags: anupam kherhansal mehtatweet war
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Media One Solutions, Kori Pati and itsmajja original series Dahavi-A trailer received more than one lakh views and likes in just a few hours.

'दहावी-अ'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.