शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दहावी-अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2024 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Media One Solutions, Kori Pati and itsmajja original series Dahavi-A trailer received more than one lakh views and likes in just a few hours.

‘इट्स मज्जा’च्या ‘दहावी-अ’ या ओरिजिनल सीरिजच्या ट्रेलरला अवघ्या काही तासांत एक लाखांहून अधिक व्ह्यूज

‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी व हवीहवीशी वाटणारी गोष्ट प्रेक्षकांनाही तितकीच भावली होती. पण २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. अनेकांनी ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. मात्र ‘आठवी-अ’ या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. (Dahavi-A Series Trailer)

त्यामुळे अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते आणि प्रेक्षकांची ही उत्सुकता नुकतीच संपली. २६ डिसेंबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘दहावी-अ’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. समस्त सातारकर आणि आजूबाजूच्या गावातील प्रेक्षकांनी या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘दहावी-अ’साठी प्रसिद्ध फुड ब्रँड ‘पालेकर’ व ‘द परफ्युम हाऊस’ यांचे सहकार्य लाभले आहे. 

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतलं हक्काचं घर, वास्तुशांतीवेळी उखाणा घेताना रडली बायको, भावुक व्हिडीओ समोर

‘दहावी-अ’ मध्येही ‘आठवी-अ’मधील अथर्व अधाटे, सृष्टी दणाने, ओम पाणस्कर, श्रेयश कटके, सत्यजित होमकर, रुद्र इनामदार व संयोगिता चौधरी हे कलाकार आहेत. तसंच इतर कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सगळ्या कलाकारांनी ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘दहावी-अ’चा हा ट्रेलर लाँच होताच अवघ्या काही क्षणांत लाखों व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. “ट्रेलर खूप छान आहे”, “खूप आवडला ‘दहावी-अ’चा ट्रेलर”, “अखेर आमची आतुरता संपली” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या ट्रेलरला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – “हफ्ते परवडत नाहीत म्हणून…”, गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “बघत राहा की…”

त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांनी या सीरिजच्या पहिल्या भागासाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे. दरम्यान, शाळेचं दहावीचे वर्ष हे कायमच सर्वांसाठी खास असते. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास व संस्मरणीय आठवणींची शिदोरी घेऊन प्रत्येकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व उलगडून दाखवणारी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ची ओरिजिनल सीरिज ‘दहावी-अ’ येत्या ६ जानेवारी पासून सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे

Tags: Dahavi-A Series TrailerItsmajja Dahavi-A Series NewsItsmajja Original Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
dhananjay powar viral video

Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम डिपीचं इंग्रजी भाषेत तुफान संभाषण, तुम्हीही पोट धरुन हसाल, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.