२०२३ हे वर्ष मराठीतील अनेक कलाकारांसाठी लाभदायी ठरले. २०२४ या वर्षात कुणी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. तसंच २०२४ या वर्षात कुणी नवीन गाडी घेतली तर, कुणी नवीन घरही घेतलं. २०२४ मध्ये मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, ऐश्वर्या-अविनाश नारकर, अमृता खानविलकर, शिवाली परब व रोहित माने यांसारख्या अनेकांनी नवीन घर घेतलं. या वर्षात आणखी एका अभिनेत्याचे नवीन घराचे स्वप्न साकार झाले आणि हा अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. ऋतुराजने बायकोबरोबर घराची किल्ली हातात पडकत एक फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला होता. (Ruturaj Phadke wife ukhana video)
हा फोटो शेअर करत त्याने दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर घेतल्याची माहिती दिली होती. ऋतुराजने याबाबत एक पोस्टही लिहिली होती. ऋतुराजची पत्नी प्रीती हिने याबद्दल एक खास पोस्टही लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं होतं की, “स्वतःचं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ऋतुराज आणि मी बरीच स्वप्नं पाहिली, त्यातलच एक स्वप्नं म्हणजे “आपलं स्वतःच हक्काचं घर”. ते कसंही असो, लहान किंव्हा मोठं, पण ते आपलं स्वतःच असावं. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है’ हे आम्ही अनुभवलं”.
अशातच अभिनेत्याच्या या नवीन घराची वास्तुशांती नुकतीच पार पडली आहे आणि या वास्तुशांती सोहळ्याची खास झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या वास्तुशांतीच्या पूजेवेळी ऋतुराजच्या पत्नीने खास उखाणाही घेतला. यावेळी ती म्हणाली की, “दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न, अखेर आज तो दिवस आला, स्वत:चं हक्कांचं घर घेऊन खूप आनंद झाला, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच असुदेत पाठीशी. ऋतुराज रावांचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी”. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “जे स्वप्न पाहिलं होतं ते…” रेश्मा शिंदेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लग्नाचा खास व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओखाली त्यांना नवीन घरानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतून ऋतुराज फडके घराघरांत पोहोचला होता. या मालिकेत त्याने कार्तिक ही भूमिका साकारली होती. अनेक नाटकांत व मालिकेत काम केलेल्या ऋतुराजला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २७ जानेवारीला ऋतुराजने प्रितीबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.