शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta serial fame Actor Rajas Sule and Chaitrali Pitale are married photos viral on social media

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठी कलाविश्वात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत, काही दिवसांपूर्वी  रेश्मा शिंदे, किरण गायकवाड आणि शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. आणि हा अभिनेता म्हणजे राजस सुळे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळेने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने नुकतंच लग्न केलं आहे. (Rajas Sule and Chaitrali Pitale Married)

राजस सुळे आणि चैत्राली पितळेचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नात राजसने राजेशाही पेहराव केला होता. ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट घातला होता; ज्यावर सोनेरी रंगाचा फेटा घातला होता. तसंच चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. राजस आणि चैत्राली राजेशाही लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते. अभिनेत्याने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या प्रीवेडिंग फोटोशूटची झलक शेअर केली होती. आता चैत्राली आणि राजस यांच्या लग्नाचेही फोटो समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबता थांबेना, चित्रपटात ‘तो’ सीन करणं भोवलं, काँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल

राजस-चैत्राली यांच्या मित्र परिवाराने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो शेअर करत खास शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनीही त्यांच्या मिहिरला शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्यात. मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी राजस आणि चैत्रालीच्या लग्नाला खास हजेरी लावली होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर आणि मुक्ता यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यावेळी मिहिरने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली होती. 

आणखी वाचा – अधिपती अक्षरामधील गैरसमज अधिक वाढणार, भुवनेश्वरी ठरणार कारण, नवीन ट्विस्टवर प्रेक्षकही नाराज

दरम्यान, राजस सुळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. त्याने साकारलेली मिहीरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आधी अभिनेता ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता.

Tags: Premachi Goshta serial fame Rajas SulePremachi Goshta serial fame Rajas Sule and Chaitrali Pitale are marriedRajas Sule and Chaitrali Pitale Married
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
allu arjun police inquiry

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर पोलिसांकडून कसून चौकशी, तीन तासांत तब्बल बारा प्रश्न, पुढे काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.