दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी हैद्राबाद येथील संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकदेखील करण्यात आली होती. मात्र काही वेळानंतर त्याला अटकपूर्व जामीन मिळाला. अशातच काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावर हल्लादेखील करण्यात आला. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. यादरम्यान या अल्लू अर्जुनची मंगळवारी सुमारे तीन तास चौकशी केली गेली. हैद्राबाद येथील चिक्कडपल्ली पोलिसस्थानकात सुरु असलेली चौकशी संपली आहे. (allu arjun police inquiry)
अल्लू अर्जुन प्रीमियरच्या दिवशी संध्या थिएटर येथे पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतले होते. आता चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला काय विचारले याबद्दल जाणून घेऊया. मंगळवारी सकाळी १० वाजता अल्लू अर्जुन जुबली हिल्स येथील घरातून पोलिसस्थानकात पोहोचला. ही चौकशी तीन तासापेक्षा अधिक सुरु झाली. दुपारी २.३० मिनिटांनी तो पुन्हा घरी जाण्यासाठी रवाना झाला.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
यावेळी पोलिसांनी विचारले की, “संध्या थिएटरमध्ये जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली?”, “संध्या थिएटरमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाली होती का?”, “याबद्दल तुम्ही प्रशासनाला कल्पना दिली होती का?”, “तेथील व्यवस्थापनाने तुम्हाला येण्यासाठी मनाई केली होती का”, “पोलिसांनी जाण्यासाठी मंजूरी दिली नाही याबद्दल तुम्हाला कल्पना होती का?”, “तुम्ही आणि तुमच्या पीआर टीमने पोलिसांबरोबर संपर्क करुन परवानगी घेतली होती का?”, “संध्या थिएटरच्या आसपास काय परिस्थिति आहे याबद्दल तुम्हाला पीआरने सांगितले होते का?”.
त्यानंतर विचारले की, “जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये पोहोचलात तेव्हा सुरक्षेसाठी बाऊन्सर्स होते का?”, जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये पोहोचलात तेव्हा तेथील परिस्थिति काय होती?”, “जेव्हा चेंगराचेंगरी झाली आणि महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही तिथे हजर होतात का?”, “तुम्ही संध्या थिएटरमध्ये किती वेळ थांबलात?”, “जेव्हा तेथील परिस्थिति तुम्हाला कळली तेव्हा ते सांभाळण्यासाठी तुम्ही काय केलंत?”, असे १२ प्रश्न अल्लू अर्जुनला चौकशीदरम्यान विचारण्यात आले. दरम्यान आता या प्रकणाला कोणते वळण लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.