शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२० वर्षांपूर्वी अशी दिसायची दीपिका पदुकोण, चेहराही होता खूपच वेगळा, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 23, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
deepika old video viral

२० वर्षांपूर्वीचा दीपिका पदुकोणचा व्हिडीओ चर्चेत

सध्या बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे नाव दुआ ठेवल्याची माहितीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. बंगळुरू येथील दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये ती मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दिसून आली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो चांगलाच दिसून आला. तिच्या कॅज्युअल लूकची चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली.  दीपिकाने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. मात्र सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (deepika old video viral)

दीपिकाने २००७ साली शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दीपिका एक मॉडेल होती. तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. हिमेश रेशमीयाच्या ‘नाम है तेरा’ या गाण्यामध्येही ती दिसून आली. अशातच आता दीपिकाचा एक जुना जाहिरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दीपिका कशी होती? हे यामध्ये बघायला मिळत आहे.  ही जाहिरात चेन्नई येथील एका महिलांच्या कपड्यांच्या ब्रॅंडसाठी शूट करण्यात आले होते.

आणखी वाचा -दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये महिलेबरोबर गैर प्रकार, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, पोस्ट व्हायरल

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका नवविवाहित नवरीप्रमाणे दिसत आहे. ती एका माप ओलांडून घरात प्रवेश करताना दिसत आहे. लग्नानंतर ती नवीन आयुष्याबद्दल विचार करत असतानाच आईची आठवण येत असलेलीदेखील दिसत आहे. आईबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ती आठवताना दिसत आहे. यामध्ये अचानक आईला बघून खूप आनंदी झालेलीही दिसत आहे. यावेळी तिच्या गालावरील खळी अधिक लक्ष वेधत आहे.

आणखी वाचा – ‘कुत्र्यासारखा झोपतो…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड गायकाने सलमान खानला दारुड्या व फालतू म्हणून हिणावलं, इतका राग का?

दीपिका साधारण यावेळी २० वर्षांची होती. यावेळी तिचे सौंदर्य व निरागसता याबद्दल चर्चा दिसून आली. एका नेटकऱ्याने ही जाहिरात शेअर करत लिहिले की, “तिच्या सुरुवातीच्या २० व्या वर्षाबद्दलचे काही खास क्षण. खूप निरागस आणि इतकी खरी वाटत आहे. दीपिकावरुन नजरच हटत नाही”. यावर एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “त्यावेळी खूप निरागस होती”.तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप गोड आणि हेल्दी”. तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “कोलगेटच्या जाहिरातीमधील दीपिका मला आठवली. खूप सुंदर दिसायची”. आशा प्रकारे तिच्या सौंदर्याची खूप चर्चा केली आहे.
  

Tags: deepika padukoneold videoviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
film director Shyam Benegal passed away at the age of ९०

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.