शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाचा मुलगा यशवर्धनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लवकरच चित्रपट येणार, प्रेक्षकांची पसंती मिळणार का?

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 19, 2024 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda son in movies

गोविंदाचा मुलगा करणार अभिनयक्षेत्रात क्षेत्रात पदार्पण

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर गोविंदाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गेले ३५ वर्ष गोविंदा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. या कार्यकाळात ‘आंखे’, ‘साजन चले सासुराल’, ‘कुली नं १’, ‘एक और एक ग्यारह’, ‘भागमभाग’ व ‘पार्टनर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धनदेखील आता वाडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये यशवर्धन चित्रपटांमध्ये काम करताना दिसू शकतो. (govinda son in movies)

मिळालेल्या माहितीनुसार, यशवर्धन अभिनयाची सुरुवात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक साई राजेशच्या येणाऱ्या एका चित्रपटातून करणार आहे. या चित्रपटात एक छान अशी प्रेमकहाणी असेल. यामध्ये गोविंदाचा मुलगा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी यशवर्धनने ऑडिशनही दिली होती. ही भूमिका त्याला त्याच्या मेहनतीने मिळाली आहे. दिग्दर्शक साई राजेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आणखी वाचा -‘पुष्पा २’ चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटी रुपयांना खरेदी केले राईट्स

View this post on Instagram

A post shared by Yashvardhan (@ahuja_yashvardhan)

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी आता मुख्य भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना एक नवीन जोडी सादर करायची आहे. यासाठी आतापर्यंत १४,००० पेक्षा अधिक ऑडिशनच्या कलिप्स समोर आल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच चित्रपटाची नायिका ठरणार आहे. तसेच २०२५ पासून या चित्रपटांचे काम सुरु करण्यात येईल.

आणखी वाचा – “तो गुंडासारखा…”, ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारण्यावरुन मुकेश खन्नांचा रणबीर कपूरवर राग, म्हणाले, “पार्टी, दारु पिण्याची…”

तसेच या चित्रपटासाठी साई राजेश व निर्माते या लव्ह स्टोरीसाठी एक खास गाणंदेखील आणणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांचे लक्ष याकडे लागणार आहे. त्यामुळे गोविंदाचा मुलगा एका नव्या आणि रोमॅंटिक अंदाज बघायला मिळणार आहे.तसेच सध्या गोविंदा चित्रपटांपासून दूर असलेला दिसून येतो. मात्र त्याने 80 व 90 च्या दशकामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचवेळी त्याने सुनीताबरोबर लग्नगाठही बांधली. परंतु याबद्दल त्याने कोणालाही कळू दिले नव्हते.   

Tags: Bollywood debutgovindasonyashwardhan ahuja
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shiva marathi serial update shiva and ashu will separate from each other by getting divorced new promo viral on social media

आशू-शिवा कायमचं एकमेकांपासून दूर होणार, नात्यामध्ये दुरावा?, मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.