शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“BMC, कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, फिल्मसिटीमधील कचऱ्याचा ढिग पाहून वैतागला शशांक केतकर, म्हणाला, “अशी हजारो ठिकाणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 7, 2024 | 2:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar Video

फिल्मसिटीमधील कचऱ्याचा ढिग पाहून वैतागला शशांक केतकर

Shashank Ketkar Video : सोशल मीडियावरील अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. याआधीही शशांकने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ बनवून पोस्ट केले. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने बनवलेले हे व्हिडीओ पाहून प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले. शशांक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच अभिनेत्याने पुन्हा एकदा फिल्मसिटी येथील कचऱ्यामुळे घाणेरड्या झालेल्या ठिकाणाचा थेट व्हिडीओ शेअर करत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

शशांकने इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “फिल्मसिटीचा प्रवेश कधीच मला दुखावत नाही. कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकिरड्यावर असणाऱ्या या राजमातेला वंदन करुन फिल्मसिटीच्या थोडं आत जाऊया आणि बघूया आणखी थोडा कचरा. फिल्मसिटीच्या आत असलेल्या ओल्या कचऱ्याच्या या पेट्या आहेत आणि यांत सुका कचरा आहे, कदाचित या प्लास्टिकच्या पिशव्या ओल्या असाव्यात. कचरा बघितलात. हास्यास्पद आहे ना. मागच्या वेळी मी एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडीओनंतर BMC ने दाखल घेतली. त्यानंतर मी फिल्मसिटीमध्ये जवळपास १५ वेळा तरी आलो असेल, परिस्थिती जैसेथे आहे”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचं कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मदतीचं आवाहन, भावुक पोस्ट करत म्हणाली, “उपचार घेणे कठीण होत आहे आणि…”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

पुढे त्याने असं म्हटलं की, “खूप वाट पाहिली पण काहीच फरक पडला नाही म्हणून आज हा पुन्हा व्हिडीओ करतोय. प्रत्येक भागात कचऱ्याच्या पेट्या आहेत, पण इतकं करुन मोकळे होऊ नका. आपली लोकसंख्या खूप आहे त्यामुळे कचरा खूप होणार आहे. त्यामुळे खूप घाणेरडी ठिकाणं असणार आहे आणि त्या ठिकाणी अशी दोन-चार तुटलेले डबे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या, जितका कचरा, जितकी ठिकाणं त्या ठिकाणी कचरा गोळा करायला सामग्री ठेवा”.

आणखी वाचा – एक तप पूर्ण ! लग्नाला १२ वर्ष पूर्ण होताच हेमंत ढोमेची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “पाटलीणबाई…”

शशांकने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “मला कल्पना आहे की, हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी हजारो ठिकाणं आहेत जिथे कचरा जमलेला असतो. बदलाची सुरवात ही छोट्या छोट्या गोष्टींमधूनच होत असते. जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जा सारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार. मी व्हिडीओ बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन, सहन करु नका. कचरा दिसेल तिथे व्हिडीओ शूट करुन तुमच्या महानगरपालिकेला टॅग करा. निदर्शनास आणून द्या. माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल अशी आशा करतो. सगळे मिळून प्रयत्न करुया. स्वच्छ देश घडवूया”.

Tags: marathi actorshashank ketkarShashank Ketkar Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Ankita Walavalkar On Pushpa 2

"कृपया 'पुष्पा २'साठी पैसे घालवू नका आणि…", अंकिता वालावलकरला आवडला नाही अल्लू अर्जुनचा चित्रपट, म्हणाली, "स्टोरी नाहीच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.