मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे हा सतत चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर हेमंतने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कधी तो कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. तर कधी त्याचे काह हटके फोटोस चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हेमंतने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी क्षिती जोगबरोबर खास फोटो शेअर केला आहे. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत. त्या निमित्तानं हेमंतने दोघांचे लग्नातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. (hemant dhome and kshiti jog wedding anniversary)
दरम्यान हेमंतने शेअर केलेल्या फोटोला हटके असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “या वेडेपणाचा एक तप पूर्ण. असाच वेडेपणा चालू ठेऊ. बाकी काय होईल मग आपोआप. लव्ह यु पाटलीण बाई”. या कॅप्शनकडे संगळ्यांचेच लक्ष वेढ्ओले होते. तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावदेखील केला आहे. मुग्धा कर्णिक, अभिजीत खांडकेकर, सायली संजीव यांनी शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
हेमंत व क्षिती हे २०१२ साली लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ‘सावधान शुभमंगल’ या नाटकाच्या तालमीदरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा – तारीख ठरली! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
दरम्यान हेमंत व क्षिति ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने चांगलेच चर्चेत आले होते. २०२१ साली आलेल्या ‘झिम्मा’ च्या यशानंतर त्यांनी ‘झिम्मा २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतने केले होते. तर क्षिति या चित्रपटाची निर्माती होती. ‘झिम्मा’च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला होता. तसेच बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच कमाई केली होती.