शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रमोद-विराजचा स्वत:च्याच ऑफिसमध्ये मोठा फ्रॉड, लीलाने समोर आणलं सत्य, आता एजे काय शिक्षा करणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 3, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
navri mile hitlerla serial update serial update new promo Leela revealed to ej that pramod and viraj cheated in their own office

प्रमोद व विराज यांनी स्वत:च्याच ऑफिसमध्येच केला फ्रॉड, लीलाने एजेंसमोर आणलं त्यांचं सत्य, प्रोमो व्हायरल

झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत काय घडतं? काय बिघडतं? याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. आता या मालिकेत अनपेक्षित वळण आलं आहे. लीलाच्या घर चालवण्याचा अंदाज पाहून एजे प्रभावित होणार आहे. लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेतायत, पण आता दुर्गा त्याला विरोध करते. (navri mile hitlerla serial update)

एजे आणि सरोजिनी सोडून सगळेजण दुर्गाच्या बाजूने आहेत. शेवटी, लीला घर सोडून जाते आणि पुन्हा एजे आणि लीलामध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, विश्वरूपच्या मदतीने ते दोघं पुन्हा एकत्र येतात. याच दरम्यान किशोर आणि विक्रांत एका योजनेवर काम करतायत ज्यावर त्यांचे मतभेद होतात. एजे लीलाला त्याच्या रेस्टॉरंट पुन्हा जॉईन करण्याचा सल्ला देतो. लीलाला रेस्टॉरंटमधील घोटाळ्याचा संशय आला आहे. मालिकेचे हे कथानक अगदीच अनपेक्षित आहे आणि याच ट्विस्टचा प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : २४ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री समुद्रकिनारी करत होती योगा, मोठी लाट आली अन् जागीच मृत्यू, कॅमेऱ्यामध्ये घटना कैद

या प्रोमोमध्ये लीला एका गाडीचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि तिला पाठलाग करताना बघून गाडीच्या चालकालाही संशय येतो. यावर तो ही बाई आपला पाठलाग करत आहे का? असं विचारतो. यावर बाजूला बसलेला माणूस त्या आपल्या लीला मॅडम आहेत, म्हणजेच एजे सरांच्या मिसेस असं म्हणतो. यानंतर गाडीच्या समोर जात लीला गाडी थांबवते आणि गाडीची चौकशी करते. चौकशी केल्यानंतर तिला लक्षात येते की, यात एजेंच्या ऑफिसमधील काही गोष्टी आहेत. यानंतर ती ऑफिसमध्ये जात या संपूर्ण प्रकरणी चौकशी करते.

आणखी वाचा – अप्पी-अर्जुनने पुन्हा लग्न करण्यास अमोलला दिला नकार, निर्णय ऐकताच चक्कर, रुग्णालयात भरती होताच निर्णय बदलणार का?

तेव्हा तिच्या लक्षात येते की, प्रमोद आणि विराज हे त्या घोटाळ्याचे मुख्य चेहरे आहेत. यावर एजेदेखील त्यांच्यावर भडकतात. “स्वत:च्या ऑफीसमध्ये एवढा मोठा फ्रॉड करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही” असं म्हणत ते रागावतात. तसंच यावर मला आता काही तरी अ‍ॅक्शन घ्यावीच लागणार आहे असंही ते म्हणतात. त्यामुळे आता एजे ऊयाय दोघांवर नक्की काय अ‍ॅक्शन घेणार? यामुळे लीला-एजेंच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Navri Mile HitlerlaNavri Mile Hitlerla Serial Updatenavri mile hitlerla zee marathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aastad Kale On His Wife

आई जागेवर असताना बायकोने केली सगळी सेवा, आस्ताद काळेने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला, "तिने दुःख न गोंजारता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.