शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री केलेल्या ‘त्या’ ट्विटची सर्वत्र चर्चा, नेटकरीही चिंतेत, म्हणाले, “नक्की झालं तरी काय?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Bachchan Angry Tweet

अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री केलेल्या 'त्या' ट्विटची सर्वत्र चर्चा, नेटकरीही चिंतेत

Amitabh Bachchan Angry Tweet : बिग बी अमिताभ बच्चन हे एक अशा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी आजवर बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ व्यतीत केला आहे आणि आपल्या कारकिर्दीतील यश व अपयशाच्या काळातही ते कधीही असंयम झाले नाहीत. अमिताभ नेहमी मोजमाप आणि विचारपूर्वक विधाने करताना दिसतात आणि त्यांची ही शैली त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं ठरवते. अशातच बिग बींनी इतकं विचित्र ट्विट केलंय की ते काय आहे असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. नेहमीच अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगद्वारे अनेक विषयांवर सडेतोडपणे भाष्य करताना दिसतात. हल्लीच त्यांनी त्यांच्या कुटुंबाची बाजू सांभाळत केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरलं होतं.
यानंतर आता अमिताभ यांनी मध्यरात्री केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अमिताभ यांनी २ डिसेंबर रोजी सकाळी १:४२ वाजता एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने फक्त एक शब्द आणि एक इमोजी शेअर केला आहे. आपल्या 5210 व्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, “शांत!”, याबरोबर त्यांनी एक भडकणारा असा इमोजी देखील पोस्ट केला आहे. हे ट्विट पाहून लोक चिंतेत आले आहेत आणि काय झाले असा सवाल करत आहेत. ट्विटरवर आलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रश्नांचा भडीमार केला आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहिले आहे की, “हे काय होते?”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “हा एक शब्द सर्वत्र काम करतो. सर्वोत्तम शब्द”. तर एका नेटकऱ्याने विचारले, “पुढे काय झाले?”.

आणखी वाचा – …अन् त्या मुलीला बेड मिळवून देण्यासाठी केइएम रुग्णालयात पोहोचली अंकिता वालावलकर, रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, “शब्द नाहीत…”

काही काळापासून बच्चन कुटुंबाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवाही सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरलेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओ व फोटोंवरुन असे दिसते की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि त्यांनी या अफवांवर मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे हे संतप्त ट्विट चर्चेत आले आहे.

आणखी वाचा – नवऱ्यासह देवदर्शन करत आहे रेश्मा शिंदे, साऊथ इंडियन लूकने वेधलं सर्वाधिक लक्ष, फोटो व्हायरल

काही लोक त्याच्या ‘मौन’ चा संबंध त्याचा मुलगा व सून यांच्याबद्दल पसरलेल्या अफवांशी देखील जोडत आहेत. मात्र, अभिनेत्याने यापुढे पोस्ट करत आणखी काही सांगितलेले नाही. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. ते म्हणाले होते की अफवा फक्त अफवा आहेत. कोणत्याही पडताळणीशिवाय त्या फक्त अफवा आहेत.

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan Angry Tweetbollywood news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Tharala Tar Mag TRP

'ठरलं तर मग' मालिका टीआरपीमध्ये सतत टॉपला का असते?, जुई गडकरीने सांगितलं कारण, म्हणाली, "देवाचा पाठिंबा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.