Amitabh Bachchan Angry Tweet : बिग बी अमिताभ बच्चन हे एक अशा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी आजवर बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ व्यतीत केला आहे आणि आपल्या कारकिर्दीतील यश व अपयशाच्या काळातही ते कधीही असंयम झाले नाहीत. अमिताभ नेहमी मोजमाप आणि विचारपूर्वक विधाने करताना दिसतात आणि त्यांची ही शैली त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं ठरवते. अशातच बिग बींनी इतकं विचित्र ट्विट केलंय की ते काय आहे असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. नेहमीच अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगद्वारे अनेक विषयांवर सडेतोडपणे भाष्य करताना दिसतात. हल्लीच त्यांनी त्यांच्या कुटुंबाची बाजू सांभाळत केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरलं होतं.
यानंतर आता अमिताभ यांनी मध्यरात्री केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अमिताभ यांनी २ डिसेंबर रोजी सकाळी १:४२ वाजता एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने फक्त एक शब्द आणि एक इमोजी शेअर केला आहे. आपल्या 5210 व्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, “शांत!”, याबरोबर त्यांनी एक भडकणारा असा इमोजी देखील पोस्ट केला आहे. हे ट्विट पाहून लोक चिंतेत आले आहेत आणि काय झाले असा सवाल करत आहेत. ट्विटरवर आलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रश्नांचा भडीमार केला आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहिले आहे की, “हे काय होते?”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “हा एक शब्द सर्वत्र काम करतो. सर्वोत्तम शब्द”. तर एका नेटकऱ्याने विचारले, “पुढे काय झाले?”.

काही काळापासून बच्चन कुटुंबाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवाही सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरलेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओ व फोटोंवरुन असे दिसते की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि त्यांनी या अफवांवर मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचे हे संतप्त ट्विट चर्चेत आले आहे.
आणखी वाचा – नवऱ्यासह देवदर्शन करत आहे रेश्मा शिंदे, साऊथ इंडियन लूकने वेधलं सर्वाधिक लक्ष, फोटो व्हायरल
काही लोक त्याच्या ‘मौन’ चा संबंध त्याचा मुलगा व सून यांच्याबद्दल पसरलेल्या अफवांशी देखील जोडत आहेत. मात्र, अभिनेत्याने यापुढे पोस्ट करत आणखी काही सांगितलेले नाही. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. ते म्हणाले होते की अफवा फक्त अफवा आहेत. कोणत्याही पडताळणीशिवाय त्या फक्त अफवा आहेत.