शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाबरोबरचा कृष्णा अभिषेकचा वाद मिटला, पण मामी अद्यापही नाराज, म्हणाला, “माफी मागितली तरीही…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 25, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Kapil Sharma Show fame Comedian Krishna Abhishek commented on his relationship with actor Govinda and Sunita Ahuja

कृष्णा अभिषेकचे गोविंदाबरोबरचे नाते सुधारले, पण मामीबरोबर अद्याप काहीच बोलणं नाही

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्यात नवनवीन पाहुणे हजेरी लावत असतात. या पाहुण्यांसोबत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी कपिल शर्मा व त्याचे सहकारी सज्ज असतात. ‘द कपिल शर्मा शो’चा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेकच गायब होता. यामागचं कारण मामा व भाच्यातील वैर मानलं जात आहे. मामा गोविंदासोबत कृष्णा व त्याच्या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून वैर सुरू होते. मात्र आता हे वैर संपले आहे. कारण कपिल शर्माच्या आगामी शोमध्ये गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकबरोबर दिसणार आहे. (Krishna Abhishek on his relationship with Govinda and Sunita Ahuja)

३० नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदा शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्याबरोबर सहभागी होणार आहे. कृष्णा त्याच्या मामाचे स्वागत करतो आणि त्यांच्यातील भांडण संपल्याची पुष्टी करतो. मग दोघेही एकत्र डान्स करतात. मामा-भाच्याच्या या भेटीवर स्वत: कृष्णाने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्याने गोविंदाबरोबर मतभेद मिटवण्याविषयी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

याबद्दल तो असं म्हणाला की, “एवढ्या मोठ्या कालावधीनंतरचा मामाबरोबरचा हा माझा सर्वोत्तम अनुभव होता. माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे, असे मी स्टेजवरही म्हणालो. आता आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही खूप नाचलो आणि खूप मजा केली. मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर परिस्थिती बदलली. ही घटना घडली तेव्हा मी एका कार्यक्रमासाठी सिडनीत होतो. आणि मी आयोजकांना शो रद्द करण्यास सांगितले. कारण मला भारतात यावे लागले आणि मला परिस्थिती किती गंभीर आहे हेदेखील माहित नव्हते”.

आणखी वाचा – ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीने साजरी केली Bride To Be Party, लवकरच विवाहबंधनात अडकणार, फोटो व व्हिडीओ व्हायरल

यापुढे कृष्णा म्हणाला की, “मामाच्या अपघतावेळी काश्मिरा मुंबईत होती आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटणारी ती कुटुंबातील पहिली सदस्य होती. तेव्हा मामांनी त्याला चांगली वागणूक दिली. ICU मध्ये काही वेळ तिच्याशी बोललेही. रक्ताची नाती म्हणजे रक्ताची नाती असतात. मला माहित होते की, एक दिवस तो बरा होईल. तो आता बरा आहे आणि तो नाचतोय याचा मला आनंद आहे”. यापुढे कृष्णाला त्याच्या मामीबरोबरच्या नात्याबद्दल विचारले.

आणखी वाचा – मैत्रिणीच्या हळदीला पोहोचली अंकिता वालावलकर, खास व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “तुझ्यासाठी आनंदी…”

तेव्हा कृष्णाने असं म्हटलं की, “मी एक-दोनदा त्यांच्या घरी जाऊन टीनाशी बोललो. तिच्याबरोबर माझे छान जमले. सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि भाऊ-बहीण खूप वेळाने एकमेकांना भेटलो. मी अजून माझ्या मामींशी बोललो नाही, पण मला खात्री आहे की आमचे संबंधही लवकरच चांगले होतील. मला वाटतं की ती ठीक आहे. मी शो दरम्यान माझ्या मामींचीही माफी मागितली कारण गोविंदा मामाने मला मामीची माफी मागायला सांगितले होते”.

Tags: Bollywood entertainment newsKrishna Abhishek on his relationship with Govinda and Sunita AhujaThe Kapil Sharma Show Fame Comedian Krishna Abhishek
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Prajakta Mali Post

प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांच्या चरणी, आश्रममध्ये केला नवा कोर्स, म्हणाली, "कलावंत नसते तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.