छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्यात नवनवीन पाहुणे हजेरी लावत असतात. या पाहुण्यांसोबत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी कपिल शर्मा व त्याचे सहकारी सज्ज असतात. ‘द कपिल शर्मा शो’चा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेकच गायब होता. यामागचं कारण मामा व भाच्यातील वैर मानलं जात आहे. मामा गोविंदासोबत कृष्णा व त्याच्या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून वैर सुरू होते. मात्र आता हे वैर संपले आहे. कारण कपिल शर्माच्या आगामी शोमध्ये गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकबरोबर दिसणार आहे. (Krishna Abhishek on his relationship with Govinda and Sunita Ahuja)
३० नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदा शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्याबरोबर सहभागी होणार आहे. कृष्णा त्याच्या मामाचे स्वागत करतो आणि त्यांच्यातील भांडण संपल्याची पुष्टी करतो. मग दोघेही एकत्र डान्स करतात. मामा-भाच्याच्या या भेटीवर स्वत: कृष्णाने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्याने गोविंदाबरोबर मतभेद मिटवण्याविषयी सांगितले.
याबद्दल तो असं म्हणाला की, “एवढ्या मोठ्या कालावधीनंतरचा मामाबरोबरचा हा माझा सर्वोत्तम अनुभव होता. माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे, असे मी स्टेजवरही म्हणालो. आता आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही खूप नाचलो आणि खूप मजा केली. मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर परिस्थिती बदलली. ही घटना घडली तेव्हा मी एका कार्यक्रमासाठी सिडनीत होतो. आणि मी आयोजकांना शो रद्द करण्यास सांगितले. कारण मला भारतात यावे लागले आणि मला परिस्थिती किती गंभीर आहे हेदेखील माहित नव्हते”.
यापुढे कृष्णा म्हणाला की, “मामाच्या अपघतावेळी काश्मिरा मुंबईत होती आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटणारी ती कुटुंबातील पहिली सदस्य होती. तेव्हा मामांनी त्याला चांगली वागणूक दिली. ICU मध्ये काही वेळ तिच्याशी बोललेही. रक्ताची नाती म्हणजे रक्ताची नाती असतात. मला माहित होते की, एक दिवस तो बरा होईल. तो आता बरा आहे आणि तो नाचतोय याचा मला आनंद आहे”. यापुढे कृष्णाला त्याच्या मामीबरोबरच्या नात्याबद्दल विचारले.
आणखी वाचा – मैत्रिणीच्या हळदीला पोहोचली अंकिता वालावलकर, खास व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “तुझ्यासाठी आनंदी…”
तेव्हा कृष्णाने असं म्हटलं की, “मी एक-दोनदा त्यांच्या घरी जाऊन टीनाशी बोललो. तिच्याबरोबर माझे छान जमले. सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि भाऊ-बहीण खूप वेळाने एकमेकांना भेटलो. मी अजून माझ्या मामींशी बोललो नाही, पण मला खात्री आहे की आमचे संबंधही लवकरच चांगले होतील. मला वाटतं की ती ठीक आहे. मी शो दरम्यान माझ्या मामींचीही माफी मागितली कारण गोविंदा मामाने मला मामीची माफी मागायला सांगितले होते”.