Prajakta Mali Post : प्राजक्ताने तिच्या सहजसुंदर अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक मालिका व चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उद्योजिकादेखील आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ता ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे जितकी ओळखली जाते तितकीच ती आध्यात्मिकही आहे. प्राजक्ता ही तिच्या कलाक्षेत्राव्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रातही तितकीच कार्यरत असते. प्राजक्ता तिच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ध्यानधारणा करताना नेहमीच पाहायला मिळते.
प्राणायाम, योग, ध्यानधारणा, संगीत, सात्विक जीवन, सात्विक जेवण, पंचकर्म, निसर्ग या गोष्टींना प्राजक्ता अधिक प्राधान्य देते. कामाच्या व्यस्ततेनंतर विश्रांतीसाठी ती कधी बाहेरच्या वातावरणात मनसोक्तपणे फिरायला जाते. तर कधी एखाद्या आश्रमात जाऊन मौनव्रत धारण करते. सध्या ती करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता ‘आर्ट ऑफ लिव्हिंगचा’ ऍडव्हान्स कोर्स करतेय. अभिनेत्री सध्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कोर्स करण्यासाठी बँगलोर आश्रमात गेली होती. एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने श्री श्री रवी शंकर यांच्या भेटीचा सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. “आणखी एक भेट. आणखी एक तीव्र संभाषण. ज्ञानी सद्गुरुसमवेत”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
तर आणखी एक पोस्ट शेअर करत, “नमस्कार मंडळी. मी आता आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बँगलोर आश्रमात. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था प्राणायम, ध्यान आणि योग शिकवते. नुकताच मी ऍडव्हान्स कोर्स संपवला आहे. मौन धारण करणं, सात्विक जेवण जेवणं अशा गोष्टी मी गेल्या चार दिवसात केल्या आहेत. सुदर्शन क्रिया हा कोर्स सगळ्यांनी शिका. याने माझं आयुष्य बदललं आहे आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल”, असं म्हणत प्राजक्ताने थेट आश्रमातून व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकदा प्राजक्ता लाईव्ह सत्संगचा अनुभव चाहत्यांना देते.
आणखी वाचा – मैत्रिणीच्या हळदीला पोहोचली अंकिता वालावलकर, खास व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “तुझ्यासाठी आनंदी…”
या पोस्टला अभिनेत्रीने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर या घडीला मी बॅंगलोर आश्रमात आश्रमवासी असते. होय होय. इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन”.