अनेक काळ तरुणांचा स्टाईल आयकॉन असणारा हँडसम, डॅशिंग असा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. गेला अनेक काळ अंकुश मराठी सिनेसृष्टीमध्ये त्याचे नाव भक्कम रोवून उभा आहे. आणि म्हणून मराठी सिनेसृष्टीमधल्या महत्वाच्या नावांमध्ये अंकुश चौधरी हे नाव आल्या शिवाय राहत नाही.अभिनय आणि नृत्यकौशल्याने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सावरखेड एक गाव, यंदा कर्तव्य आहे, झकास, डबलसीट, दगडी चाळ असे जितकी नाव घेऊ तितकी कमी पडतील.विनोदी, गंभीर, सोज्वळ अशा सर्व रूपात अंकुशला प्रेक्षकांनी आजवर पाहिलं आहे.(ankush chaudhari new movie)
महाराष्ट्र शाहीरसारखा दमदार चित्रपट अंकुशच्या नावावर कोरला गेला आहे. जेव्हा जेव्हा अंकुशच नाव येईल तेव्हा महारष्ट्र शाहीर या चित्रपटाचं नाव आल्यशिवाय राहणार नाही.या चित्रपटाने चांगलं यश संपादन केलं.या चित्रपटात अंकुशच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.अंकुशने त्याच्या कामातून अक्षरशः शाहीर डोळ्यासमोर उभे गेले.
पाहा अंकुश सोबत कोणता कलाकार झळकणार (ankush chaudhari new movie)
महाराष्ट्र शाहीरच्या भरघोस यशानंतर अंकुश लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अंकुशचा नवा चित्रपट कसा असेल, अंकुश कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळेल याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना आहे.पण यावेळेस अंकुश सोबत प्रेक्षकांचा लाडका अभिनेता झळकणार आहे, तो म्हणजे भाग्य दिले तू मला या मालिकेतील सगळ्यांचा लाडका आदित्य म्हणजे अभिनेता अमित रेखी.अमितला मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक रोज भेटतात, त्याच्या आदित्य या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.(ankush chaudhari new movie)
पंरतु लवकरच अमित मोठ्या पडद्यावर अंकुश सोबत झळकणार आहे, अमितची नवीन भूमिका कशी असेल,साकारत्मक भूमिकेत कि नाकारत्मक भूमिकेत अमित पाहायला मिळणार आहे हे बघणं नक्कीच रंजक ठरणार आहे. नव्या चित्रपटाच्या शूटच्याच दरम्यानचा अंकुश सोबतचे तसेच इतर टीम सोबतचे काही फोटोज अमितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.
हे देखील वाचा – मॉनिटर आणि अमितच्या आवाजातील सुरेल गाणं
त्यात सर्वांचा आवडता मॉनिटर म्हणजे बालकलाकार हर्षद नायबळ देखील पाहायला मिळत आहे.या चित्रपटाचं भाग मला होऊ दिलं हे माझं भाग्य आहे आणि माझ्या वर जो विश्वास दाखवला त्यासाठी धन्यवाद असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
