महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या शो मधील सर्वच पात्र ही चाहत्यांना आपलीशी करतात. दरम्यान कार्यक्रमातील मुख्य बाजू म्हणजे स्किट्स सादरीकरण. (mhj bts Video Viral)
यामध्ये अनेकांची अपार मेहनत आणि कष्ट असतात. लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ अशी सगळ्यांची मेहनत घेऊन हा कार्क्रम नटतो. यातलीच मुख्य दोन नावं म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. अनेकदा रंगमंचावर कलाकार मंडळी या दोन दिग्गजांची नावं घेऊन स्किट सादरीकरण करत असतात. यातीलच सचिन गोस्वामी हे स्किट सादरीकरणा दरम्यान प्रॅक्टिस करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात,
पाहा कलाकारांच्या पडद्यामागची धमाल (mhj bts Video Viral)
तसेच अनेक हास्यजत्रेचे bts व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी हास्यजरेला टीव्हीवर मिस करतानाची कमेंट केली आहे. शिवाय त्यांच्यासोबत काम करण्याची एकदा तरी संधी द्यावी अशी विनंती करणारी कमेंट केली आहे.
सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. नुकताच त्यांनी नाशिक येथील इव्हेन्ट दरम्यानचा रिहर्सल व्हिडीओ शेअर केला आहे. नाशिक इव्हेन्ट दरम्यान रिहर्सलचा एक bts व्हिडीओ त्यांनी शेअर केला असून यांत सचिन गोस्वामी हास्यजत्रातील कलाकारांचा धडे देताना दिसत आहेत. चला तर पाहुयात पडद्यामागची रिहर्सलची झलक…(mhj bts Video Viral)
हे देखील वाचा – ‘चाळिशीतली बंगाली महिला हवी’ म्हणून जुईला दिला नकार
सचिन गोस्वामी यांना सर्वगुण संपन्न दिग्दर्शक आणि पांढऱ्या केसांचा राजकुमार म्हणून ओळखलं जात. सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेच्या सेटवर गायन, वाद्य वादन अश्या अनेक कला सेटवर सादर करत असतात. स्किट सादरीकरण शिकवणं हे सचिन गोस्वामी यांचं काम आहेच, दरम्यान कलाकार मंडळी ही त्यांच्याकडून अभिनयाचे, सादरीकरणाचे धडे आदराने घेत असतात.
