बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण हा नुकताच विवाह बंधनात अडकला. गर्लफ्रेंड द्रीशा आचार्य हिच्या सोबत करणने लग्नगाठ बांधली. अनेक बॉलीवूड मधील कलाकार या विवाह सोहळ्याला हजर होते.अनेक दिवसापासून या लग्नाची चांगलीच चर्चा होती.परंतु या लग्नात धर्मेंद्र यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहना हजर नव्हत्या. त्याच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत.(Hema Malini)
हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि कुटुंबापासून सुरवाती पासूनच एक अंतर ठेवून असतात आणि म्हणूनच घरातलं लग्न असूनही त्या या लग्नाला हजर नव्हत्या असं म्हंटल जात.
पाहा सनी देओलच्या मुलाच्या लग्नात का गैरहजर होत्या हेमा मालिनी? (Hema Malini)
या लग्नाच्या फोटोमध्ये धर्मेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. फक्त हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली गैरहजर आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबत असलेल्या कटू संबंधामुळे त्यांनी ठरवून या लग्नाला येणं टाळलं अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत.याच सोबत हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी या विवाह सोहळयाला हजेरी लावली नसली तरी करणच्या रिसेप्शन पार्टीला इशा येणार असल्याचं समोर आलं आहे.(Hema Malini)

आजोबा आणि वडिलांप्रमाणे करणने देखील हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे,२०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करण झळकला. तर द्रीशा ही ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्ये काम करते. करण आणि द्रीशा एकमेकांना ६ वर्ष डेट करत होते.
हे देखील वाचा : ‘म्हणून’ तुटलं अभिनेता सुशांत सिंग आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचं नातं