शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंमत असेल तर…”, गेल्या २० दिवसांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पाचवी धमकी, म्हणाले, “गाणं लिहिणाऱ्याला…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 8, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Salman Khan threatened again by Lawrence Bishnoi in the last 20 days.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या २० दिवसांत लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत. गेल्या २० दिवसांत त्याला अनेक धमक्या मिळाल्या आहेत. अशातच आता अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकवण्यात आलं आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे आता सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावरच मिळाल्याचं म्हटलं जात आहे. धमकी देताना यात एका गाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. (Salman Khan Again Threatened by Lawrence Bishnoi)

काही वृत्तानुसार, धमकीच्या मॅसेजमध्ये सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर एक गाणे लिहिले आहे. गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात ठार मारले जाईल, असे या धमकीत म्हटले आहे. त्याची अवस्था अशी होईल की त्याला स्वतःच्या नावाने गाणी लिहिता येणार नाहीत. तसंच धमकी देणाऱ्यानं सलमान खानला खुलं आवाहन दिलं आहे की, हिंमत असेल तर हे गाणं लिहिणाऱ्याला वाचवा .यानंतर पोलिस आता या धमकीचा तपास करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम डीपी दादासाठी इरिनाने बनवलं खास मटण, त्यानेही ताव मारला अन्…; म्हणाली, “भावा नुसतं….”

काही दिवसांपूर्वी याच हेल्पलाइनवर एक मॅसेज आला होता. यामध्ये मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे. सलमान खान, वाद मिटवायचा असेल तर पाच कोटी रुपये देण्यात यावे आणि काळवीट हत्याप्रकरणात मंदिरात जाऊन माफी मागावी. नाही तर वाईट परिणाम होतील, असं या मॅसेजमध्ये म्हटलं गेलं होतं. याबाबत वाहतूक पोलिसांनी माहिती देताच वरळी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात एका आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली होती.

आणखी वाचा – Video : अमेरिका दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या शुटींगला पुन्हा एकदा सुरुवात, प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, २२ दिवसांत सलमान खानला पाचव्यांदा धमकी मिळाली आहे. याआधीही त्याला तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अभिनेता सलमान खान सध्या हैदराबादमध्ये आहे. तो त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत.

Tags: Lawrence Bishnoi Threatens Salman KhanSalman Khan Again ThreatenedSalman Khan Again Threatened by Lawrence Bishnoi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo

प्रिया बापट व उमेश कामतने लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, क्युट रोमँटिक क्षणांनी वेधलं लक्ष, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.