कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी कोणती गोष्ट समोर येते तर ती कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा.आता कोल्हापूर म्हटलं की समोर आणखी एक नाव येते ते म्हणजे डीपी दादा अर्थात धनंजय पोवार. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात डीपीने सहभाग घेतला होता. तेव्हापासून डीपी अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहेत. बिग बॉस च्या घरातील यंदाच्या पर्वातील सर्वच स्पर्धक चर्चेत आले आहेत. यापैकी डीपी व इरिना यांचा खास बॉण्ड प्रेक्षकांना पाहायला मिळाला. (Irina made mutton for DP)
इरिना व डीपी यांच्यातील खास बॉण्ड प्रेक्षकांनी बिग बॉसच्या घरात तर अनुभवलाच. मात्र बिग बॉसच्या घराबाहेरही त्यांनी आपली मैत्री जपली आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकमेकांच्या भेटी घेत आहेत. नुकतंच इरिना व डीपी यांनी एकत्र भाऊबीज केली. यावेळी डीपीने इरिनासाठी खास मिसळही बनवली होती. अशातच आता डीपीसाठी इरिनाने खास डिश केली आहे. इरिनाने डीपीसाठी बनवलेली ही खास डिश म्हणजे डीपीच्या आवडीचं मटण.
आणखी वाचा – सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाचा पहिला फोटो समोर, आई-वडिलांनी फोटो शेअर करत दाखवली झलक, पाहून नेटकरीही थक्क
डीपी आणि त्याचं मटणप्रेम हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अशातच परदेसी गर्ल इरिनाने कोल्हापूरच्या आपल्या भावासाठी खास मटण बनवलं आहे. डीपीने हा मटण खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये इरिना डीपीला मटण देण्याआधी डीपी खूपच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि मग मटण समोर येताच डीपी त्यावर ताव मारतो. यादरम्यान,इरिना त्याला असं म्हणते की, “भावा खुश???”.
सोशल मीडियावर डीपीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर डीपीच्या या व्हिडिओवर इरिनानेही कमेंट केली आहे. “भावा तुम्ही खुश तर मी खुश. नुसतं मटण” अशी कमेंट करत तिने या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, डीपीने इरिनाला मिसळ देऊन तिचा खास पाहुणचार केला होता. त्यानंतर इरिनाने लाडक्या डीपीसाठी खास मटण बनवत त्याचा पाहुणचार केला आहे.