शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi फेम ‘परदेसी गर्ल’ इरीनाने लाडक्या डीपी दादांबरोबर साजरी केली यंदाची भाऊबीज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 3, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Irina Rudakova celebrated this year's bhaubeej with Dhananjay Powar and she shared the video on social media.

इरीना रुडाकोवाने डीपी दादांबरोबर साजरी केली यंदाची भाऊबीज, व्हिडीओ सोशक मीडियावर व्हायरल

आज देशभरात सर्वत्र भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. बहिण- भावाच्या नात्यातील आपुलकी जपणारा हा सण खूप खास मानला जातो. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सर्वत्र भाऊबीज सण उत्साहात साजरा होत असताना ‘बिग बॉस मराठी’ फेम इरीना रुडाकोवा व धनंजय पोवार यांनीही मोठ्या उत्साहात भाऊबीजेचा सण साजरा केला आहे. इरीनाने त्यांच्या भाऊबीज सेलिब्रेशनची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.   (Irina and Dhananjay Bhaubeej Celebration)

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जरी संपलं असलं, तरीही यात सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांची लोकप्रियता आजही कायम आहे. यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच ‘परदेसी गर्ल’ इरिनाने एन्ट्री घेतली होती. ‘बिग बॉस’च्या घरात मराठी परंपरा जपणारी इरिना सर्वांच्या पसंतीस उतरली होती. शोचा ग्रँड फिनाले संपल्यावर ही परदेसी गर्ल सध्या अन्य सदस्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ती सुरज व धनंजय यांच्या गावी गेली होती. त्यानंतर आता इरीना नुकतीच भाऊबीज साजरी करण्यासाठी धनंजयकडे गेली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by IRINA RUDAKOVA (@irina.rai9)

आणखी वाचा – स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरीना व धनंजय यांचे खास नाते प्रेक्षकांना पाहायला मिळाले. भाऊ-बहीणीचे खास नाते प्रेक्षकांनी एन्जॉयही केलं. अशातच आता इरीना व धनंजय यांनी आजचा भाऊबीज सण साजरा केला असून यावेळी धनंजयने स्वत:च्या हाताने इरीनाला मिसळ खाऊ घातली. या व्हिडीओमध्ये धनंजय इरीनाला “तुझ्यासाठी खास मिसळ घेऊन आलो आहे” असं म्हणत आहे. तर इरीनाही त्याला “नुसतं प्रेम” असं म्हणत आहे. या व्हिडीओमध्ये इरीनाबरोबर वैभवही असल्याचे पाहायला मिळत आहे. इरीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून तिने धनंजयला “हॅप्पी भाऊबीज भावा” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – दिवाळीच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला अभिनेता, पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, धनंजय व इरीना यांचा हा भाऊबीज स्पेशल व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून् घेत आहे. धनंजय व इरीना यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “विषय हार्ड”, “डीपी दादा अगदी प्रेमळ माणूस”, “सुंदर”, “खूप छान”, “संपला की विषय” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.  

Tags: Bigg Boss Marathi 5 Fame Dhananjay PowarBigg Boss Marathi 5 Fame Irina RudakovaIrina and Dhananjay Bhaubeej Celebration
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi Actress Pooja Sawant celebrated her first Diwali Padwa this year without her husband and shared a post in his memory

पूजा सावंतचा यंदाचा पहिला दिवाळी पाडवा नवऱ्याशिवाय, आठवणीत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुझी आठवण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.