बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने अनेक विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आपल्या भूमिकांनी व अभिनयाने चर्चेत असणारा हा अभिनेता नुकताच त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असतानाच, अभिनेत्याला दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला दिवाळीचा व्हिडिओ डिलीट तर करावा लागला आहे. पण त्याबद्दल त्याने एक नवीन व्हिडीओ पोस्ट शेअर करून माफीही मागितली. राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांची माफी मागितली आहे. फटाके फोडू नका त्यामुळे प्राण्यांना इजा होते अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. मात्र त्यावरून त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले. याबद्दल त्याने दूसरा आणखी एक माफीनामाचा व्हिडीओ पोस्ट केला. (Rajpal Yadav Grabbed Mobile)
हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने हात जोडून सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला गेला होता. तो मी व्हिडीओ हटवला आहे. या व्हिडीओमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो”. तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश दिवाळीच्या आनंदाला कमी करणे नव्हता… दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद आणि प्रकाशाचा सण आहे आणि तो सर्वांसाठी सुंदर बनवणे हाच खरा सण आहे”. अशातच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोगों को हंसाने वाले मशहूर फिल्म अभिनेता राजपाल यादव आखिर इतना क्यों भड़क गए?
— Zameer Ahmad (@zameerahmad_lmp) November 2, 2024
फिल्म अभिनेता राजपाल यादव आज यूपी के लखीमपुर खीरी जिले के पलिया कस्बे में पहुंचे थे, जहां एक पत्रकार के सवाल पर उनको इतना गुस्सा आ गया कि सवाल पूछ रहे पत्रकार के मोबाइल फोन पर झपट्टा मारकर मोबाइल फोन… pic.twitter.com/Gj7vCRTxEB
आणखी वाचा – 03 November Horoscope : मेष, कन्या व तूळ राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत बढती मिळेल, रविवार विशेष राशीभविष्य
राजपाल यादवचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात तो खूप संतापलेला दिसत आहे. त्याने एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावला, ज्यामुळे तो वादात सापडला आहे. राजपाल यादवचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आहे. यामध्ये पत्रकार त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारत होते. पण त्याआधीच तो खूप रागावलेला होता. यानंतर पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला तो त्याच्या वादग्रस्त दिवाळी व्हिडिओशी निगडित होता. मात्र हा प्रश्न ऐकताच अभिनेता रागाच्या भरात त्या पत्रकाराचा फोन हिसकावून फेकण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान, अभिनेता आगामी ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘भूल भुलैया ३’ मध्ये राजपाल यादवची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित या नवीन कलाकारांचीही चित्रपटात भर पडली आहे.