आज देशभरात सर्वत्र भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. बहिण- भावाच्या नात्यातील आपुलकी जपणारा हा सण खूप खास मानला जातो. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सर्वत्र भाऊबीज सण उत्साहात साजरा होत असताना ‘बिग बॉस मराठी’ फेम इरीना रुडाकोवा व धनंजय पोवार यांनीही मोठ्या उत्साहात भाऊबीजेचा सण साजरा केला आहे. इरीनाने त्यांच्या भाऊबीज सेलिब्रेशनची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Irina and Dhananjay Bhaubeej Celebration)
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जरी संपलं असलं, तरीही यात सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांची लोकप्रियता आजही कायम आहे. यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच ‘परदेसी गर्ल’ इरिनाने एन्ट्री घेतली होती. ‘बिग बॉस’च्या घरात मराठी परंपरा जपणारी इरिना सर्वांच्या पसंतीस उतरली होती. शोचा ग्रँड फिनाले संपल्यावर ही परदेसी गर्ल सध्या अन्य सदस्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ती सुरज व धनंजय यांच्या गावी गेली होती. त्यानंतर आता इरीना नुकतीच भाऊबीज साजरी करण्यासाठी धनंजयकडे गेली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
आणखी वाचा – स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”
‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरीना व धनंजय यांचे खास नाते प्रेक्षकांना पाहायला मिळाले. भाऊ-बहीणीचे खास नाते प्रेक्षकांनी एन्जॉयही केलं. अशातच आता इरीना व धनंजय यांनी आजचा भाऊबीज सण साजरा केला असून यावेळी धनंजयने स्वत:च्या हाताने इरीनाला मिसळ खाऊ घातली. या व्हिडीओमध्ये धनंजय इरीनाला “तुझ्यासाठी खास मिसळ घेऊन आलो आहे” असं म्हणत आहे. तर इरीनाही त्याला “नुसतं प्रेम” असं म्हणत आहे. या व्हिडीओमध्ये इरीनाबरोबर वैभवही असल्याचे पाहायला मिळत आहे. इरीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून तिने धनंजयला “हॅप्पी भाऊबीज भावा” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – दिवाळीच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला अभिनेता, पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला अन्…; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, धनंजय व इरीना यांचा हा भाऊबीज स्पेशल व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून् घेत आहे. धनंजय व इरीना यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “विषय हार्ड”, “डीपी दादा अगदी प्रेमळ माणूस”, “सुंदर”, “खूप छान”, “संपला की विषय” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.