सध्या सगळीकडे दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी रोशनाई, लावलेले कंदिल, रंगीबेरंगी रांगोळ्या दिवाळी सणाचे सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. अशातच नुकताच दिवाळी पाडवा साजरा झाला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. (Pooja Sawant First Diwali Padwa)
लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा सण खास असतो. यंदा अनेक मराठी कलाकारांनी त्यांचा लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा केला. अभिनेत्री गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर, अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके, सुरुची अडारकर व अभिनेता पीयूष रानडे यांसह अभिनेत्री पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यानी एकमेकांशी लग्न गाठ बांधली. त्यामुळे अनेक मराठी कलाकारांसाठी यंदाचा पहिला दिवाळसण खास आहे. मात्र अभिनेत्री पूजा सावंतसाठी यंदाचा पहिला दिवाळसण काहीसा हिरमोड करणारा आहे. कारण लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळसणाला अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर नाही.

त्यामुळे पूजाने आपल्या नवऱ्याच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी पाडव्याला पूजा नवरा सिद्धेशबरोबर नसून त्याच्या आठवणीत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पूजाने असं म्हटलं आहे की, “सिद्धेश आज मला तुझी किती आठवण येत आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही”. तसंच आणखी एक स्टोरी पोस्ट शेअर करत “दिवाळी पाडवा सिद्धेश शिवाय” असं म्हटलं आहे. यामध्ये पूजा नवऱ्याच्या आठवणीत व्याकूळ झाली असून ती नवऱ्याला खूप मिस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”
दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत बुधवारी (२८ फेब्रुवारी २०२४) रोजी लग्नबंधनात अडकली. तिने शाही पद्धतीने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाने साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांमध्ये लग्नाची खूप उत्सुकता होती, अखेर २८ फेब्रुवारी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला.