बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने कठोर परिश्रम करून आज स्टारडमचे स्थान प्राप्त केले आहे. शाहरुख खानची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर परदेशातही आहे. शाहरुख खान जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आहे. नुकताच अभिनेत्याने त्याच्या साठीमध्ये प्रवेश केला आहे. २ नोव्हेंबर बॉलिवूडच्या किंग खानचा ५९ वा वाढदिवस झाला. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते येतात. काहीजण तर दोन-दोन दिवस आधीच ‘मन्नत’बाहेर येऊन बसलेले असतात. त्यांना फक्त आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक हवी असते. त्याला भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायचे असतात. शाहरुख खानने यंदा वाढदिवसाची एक परंपरा मोडली. (Shah Rukh Khan on property distribute)
दरवर्षी तो त्याच्या वाढदिवसाचा आपल्या घराच्या बाल्कनीतून आपल्या चाहत्यांना भेटायला यायचा ते यावर्षी त्याने केले नाही. मात्र, आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून लोकांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याने आपला ५९ वा वाढदिवस कसा साजरा केला हे सांगितले. शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याची सिग्नेचर पोज देताना दिसत आहे. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या वाढदिवसाला आल्याबद्दल आणि माझी संध्याकाळ खास बनवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद… माझ्या वाढदिवसाला आलेल्या सर्व लोकांना माझे प्रेम आणि जे येऊ शकले नाहीत त्यांनाही माझे खूप प्रेम”.
See what Shah Rukh Khan has to say about his kids when a fan asks whose side he takes during their sibling squabbles! 😃😃
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 2, 2024
HBD WORLDS BIGGEST STAR #HappyBirthdaySRK#HappyBirthdayShahRukhKhan #HBDSRK #SRKDay @iamsrk pic.twitter.com/kCrmrv3LfT
आणखी वाचा – दिवाळीच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला अभिनेता, पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला अन्…; व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फॅन क्लबने बांद्रामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमाचे नाव होते, ‘SRK Day’. शाहरुखच्या या वाढदिवस स्पेशल कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सध्या सोसल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि यापैकी एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे त्याने प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा. शाहरुखच्या ‘SRK Day’ या वाढदिवस स्पेशल कार्यक्रमामध्ये एका चाहत्यांनी त्याला असा प्रश्न विचारला की, “जर त्याच्या मुलांमध्ये भांडण झाले तर तो कोणाच्या बाजूने असतो?”
आणखी वाचा – 03 November Horoscope : मेष, कन्या व तूळ राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत बढती मिळेल, रविवार विशेष राशीभविष्य
यांचे उत्तर देत शाहरुख म्हणाला की, “असं त्यांच्यात फार होत नाही. मी पण हाच विचार करत आहे. माशाअल्लाह, आजपर्यंत त्यांच्यात भांडण झाले नाही आणि पुढे होऊ पण नयेत. नाहीतर प्रॉपर्टीचे हिस्से करताना मोठी अडचण निर्माण होईल. पण तरीही मी सुहानाची बाजू घेईन. कारण मुली ठीक असतात. मला मुली सुंदर आणि गोंडस वाटतात. त्यामुळे मी सुहानाला साथ देईन आणि तिच्या पाठीश भक्कम उभा राहून संपुर्ण ताकदीने तिचे समर्थन करेन”.