शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर रणवीर-दीपिका यांनी लेकीचं केलं बारसं, खास फोटोही शेअर केला अन्…; काय आहे चिमुकलीचं नाव?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 2, 2024 | 9:13 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood couple Ranveer Singh and Deepika Padukone announced their daughter's name on the occasion of Lakshmi Pujan

रणवीर सिंह व दीपिका पदूकोण यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आपल्या मुलीचे नाव जाहीर केलं, काय नाव ठेवलं?

बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी ८ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मुलीला जन्म दिला. आई-बाबा झाल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या सर्व चाहत्यांसह शेअर केली होती.  दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. अशातच आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीप-वीरनं आपल्या चाहत्यांना आणखी एक गोड सरप्राईज दिलं आहे. दोघांनी आपल्या चिमुकलीचं नाव चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. दोघांनीही (१ नोव्हेंबर, शुक्रवार) लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर चिमुकलीचं नाव ठेवलं असून या संबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Ranveer Singh Deepika Padukone Daughter)

लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचं नाव चाहत्यांबरोबर शेअर केलं असून या दीपिका-रणवीरने मुलीचे नाव ‘दुआ पादुकोण सिंह’ असं ठेवलं आहे. दीपिका आणि रणवीरसाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास आहे. कारण यंदा त्यांच्या गोंडस चिमुकलीची पहिली दिवाळी आहे.  अशातच या दोघांनी आपल्या लेकीचे बारसेदेखील पार पाडले आहे. सोशल मीडियावर मुलीचं नाव जाहीर करताना दीपिका-रणवीर यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपवीरच्या गोंडस बाळाची चिमुकली पावलं दिसत आहेत. त्याबरोबरच कॅप्शनमध्ये दोघांनी बाळाचं नाव जाहीर केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

आणखी वाचा – ‘द डर्टी पिक्चर’चा सिक्वल येणार, विद्या बालननेच केला खुलासा, आता कसा असणार लूक?

दीपिका-रणवीर यांनी शेअर केलेल्या लेकीच्या फोटोमध्ये लगी सलवार कुर्ता परिधान केली आहे आणि ती तिच्या आईच्या कुशीत आहे. दीपिका पदुकोणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘दुआ पदुकोण सिंह’, दुआ म्हणजे प्रार्थना आणि पुढे त्यांनी लिहिले की हेच उत्तर आपल्याला प्रार्थनेत मिळते. पुढे लिहिले आहे की यावेळी त्यांचे हृदय प्रेम आणि भावनांनी भरलेले आहे. दीपिका पदुकोणच्या मुलीचा जन्म एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाला. सात दिवसांनी दीपिका पदुकोणची मुलगी २ महिन्यांची होणार आहे. पण त्याआधीच दीपिका पदुकोणने आपल्या मुलीचे नाव ‘दुआ पदुकोण सिंह’ ठेवले आहे.

आणखी वाचा – पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…

दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर दोघेही लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘कल्की’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. कल्कीच्या वेळी दीपिका पदुकोण प्रेग्नंट होती आणि तिच्या प्रेग्नेंसीबरोबरच तिने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला होता. अशातच आता दोघे जण ‘सिंघम अगेन’मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

Tags: Bollywood entertainment newsdeepika padukoneranveer singhRanveer Singh Deepika Padukone Daughter Name
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Bhool Bhulaiyaa 3 fame actor Rajpal Yadav apologized with sharing the video after being trolled saying don't burst fire crackers.

'फटाके फोडू नका' म्हणताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ट्रोल, नंतर माफीही मागितली अन्...; म्हणाला, “माझा उद्देश...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.