Pushkar Jog On Diwali Celebration : सण म्हटलं की उत्साह आलाच. सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत असतानाच सर्वत्र या सणाची धामधुम पाहायला मिळत आहे. आणि यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं असल्याचे दिसतेय. घराघरांत अगदी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतोय. दिवाळी म्हटलं की अर्थातच फटाके, रांगोळी, रोषणाई या सर्व गोष्टी आल्याच. प्रत्येकजण आनंदाने दिवाळीतील या प्रत्येक गोष्टींचा आनंद लुटताना दिसतोय. विशेषतः मोठमोठे फटाके फोडत हा आनंद रोषणाईत, आतिषबाजीमध्ये द्विगुणित केला जातो. मात्र, या फटाक्यांमुळे बऱ्याच जणांना हानी पोहोचतानाही दिसते. फटाक्यांमुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागतो.
वयोवृद्ध माणसांना या फटाकांच्या आवाजाने अतिशय त्रास होताना दिसतो. इतकंच नव्हे तर रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या जनावरांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा तर गंमत म्हणून दिवाळीत काहीजण पाळीव प्राण्यांच्या जीवाशी खेळतानाही दिसतात. कुत्र्याच्या शेपटीजवळ फटाके लावून त्याला त्रास देणं, एखादा कुत्रा झोपला असेल तर त्याला उठवण्यासाठी त्याच्या शेजारी फटाके लावणं अशा अनेक घटना घडताना दिसतात. मात्र या घटना घडू नयेत, या घटना टाळाव्यात म्हणून कमीत कमी फटाके वाजवून ध्वनी प्रदूषण कमी करावं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या जनावरांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि या सगळ्याचा आवाहन एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेलं पाहायला मिळत आहे. मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग याने याबद्दल केलेली ही पोस्ट साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. पुष्कर बरेचदा न पटणारे मुद्दे तसेच सामाजिक विषयांवर नेहमीच स्पष्टपणे आपलं मत मांडत असतो. अशातच पुष्करने फटाक्यांमुळे होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली आहे.
आणखी वाचा – Video : नवऱ्यासह अंकिता वालावलकरने गाठलं कोल्हापूर, डीपीबरोबर कुटुंबाचीही घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल
पुष्करने एक पोस्ट शेअर करत जनेतला आवाहन केलं आहे. पुष्करने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “जर कोणी मला कुत्र्यांच्या शेपटीजवळ फटाके लावताना दिसलात, तर मी स्वत: येऊन तुमच्या चड्डीच्या आत सुतळी बाँब टाकेन. कृपया अशी विकृती करु नका. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, ते फार घाबरतात. #जोगबोलणार”, असं म्हटलं आहे.