शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला तुम्ही अजिबात आवडत नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर, म्हणाली, “मला पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 31, 2024 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial fame Actress Sharmila Shinde given a direct reply to a netizen wrong comment.

"मला तुम्ही अजिबात आवडत नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटला शर्मिला शिंदेचं सणसणीत उत्तर, म्हणाली...

सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कलाकार मंडळी… सगळ्यांनाच हल्ली सोशल मीडियावर सरसकट ट्रोल केलं जातं. सोशल मीडिया हा एकमेकांबरोबर जोडलं जाण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. मात्र काही मंडळी इतरांना ट्रोल करत एकमेकांपासून तोडण्याचे काम करतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडला जातो. मात्र त्यानंतर आपण सोशल मीडियावर त्यांना काहीही बोलू शकतो असा एक समज काही नेटकऱ्यांमध्ये निर्माण होतो. ज्यांना चेहरा नाही, नाव नाही असे अनेक लोक कलाकारांना ट्रोल करतात. सोशल मीडियावर कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी व्यक्त होत असतात. (Sharmila Shinde Netizen Comment)

या सोशल मीडियामुळे कलाकारांना बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर सेलिब्रेटी अनेकदा व्यक्तही होतात. नुकतंच एका अभिनेत्रीला या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.  ही अभिनेत्री म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम शर्मिला शिंदे . मालिकेत शर्मिला दुर्गा ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाबवर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली अभिनेत्रीला एका नेटकऱ्याने कमेंट केली असून या नेटकऱ्याला अभिनेत्रीने सणसणीत उत्तरही दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : नवऱ्यासह अंकिता वालावलकरने गाठलं कोल्हापूर, डीपीबरोबर कुटुंबाचीही घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल

झी मराठीची अकाऊंटद्वारे शर्मिला शिंदेच्या लहानपणीचा फटाका फोडतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली एका महिलेने अभिनेत्रीला “तू मला अजिबात आवडत नाही” अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री शर्मिलानेदेखील या महिलेला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “मला पण तुम्ही आवडत नाही” असं म्हटलं आहे. अभिनेत्रींना ट्रॉलर्सच्या ट्रोलिंगला सामारे जावे लागते. अनेकदा कलाकारांकडून या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं जातं. पण अभिनेत्रीने या टट्रोल करणाऱ्या महिलेला चांगलेच उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – प्रथमेश-क्षितिजा यांनी जपला साधेपणा! लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचं केलं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांकडून कौतुक

दरम्यान, अभिनेत्री सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. जहागीरदार घरातील मोठी सून म्हणून ती तिची सर्व कर्तव्ये पार पाडताना दिसते. त्यामुळे लीला वेंधळी असल्याने त्या घरासाठी योग्य नाही, असे मानून ती तिला घराबाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसते. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मदतीने ती लीलाला त्रास देताना दिसते.

Tags: marathi actressSharmila ShindeSharmila Shinde Netizen Comment Answer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Ankita Walavalkar And Dhananjay Powar

बहीण असावी तर अशी! लाडक्या भावासाठी अंकिता वालावलकरने गाठलं थेट कोल्हापूर, डीपी दादांना भाऊबीज केली अन्…; फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.