शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘आई कुठे…’चं पुराण एकदाचं संपणार”, नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “अरुंधतीची मालिका…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 21, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Aani Baba Retire Hot Aahet serial start from 2 december netizens said Aai Kuthe Kay Karte will be go off air

निवेदिता सराफांची मालिका सुरु झाल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ मालिका संपणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं म्हणजे आई आणि बाबा. आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. याच विषयावर भाष्य करणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मालिकेचे नाव आहे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. (Aai Kuthe Kay Karte Will Go Off Air)

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर नुकतीच आता या मालिकेची वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत्या २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्या या वेळी स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण आता निवेदिता सराफांची मालिका सुरु झाल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ मालिका संपणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेच्या नवीन प्रोमोखाली प्रेक्षकांनी अशा अनेक कमेंट्सही व्यक्त केल्या आहेत. “‘आई कुठे काय करते मालिका संपणार”, “शेवटी ‘आई कुठे…’ पुराण संपणार”, “दुसरी आई कुठे काय करते नसली म्हणजे मिळवलं, त्यागमूर्ती महान देवी वैगरे दाखवू नका म्हणजे झालं”, “रंडुधती ची मालिका संपली” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काहींनी या मालिकेबद्दल उत्सुकताही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – श्वेता शिंदेंनीही सेलिब्रिट केला करवाचौथ, नवऱ्यासह दिल्या खास पोझ, पारंपरिक लूकमधील फोटो समोर

“अहो आमची आवडती आई कुठे काय करते मालिकेची वेळ ०२.३० आहे ही”, “निवेदिता सराफ यांना त्यांच्या स्वभावानुसारच मालिका मिळतात. त्यांचा स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येतो”, “लग्नाची बेडी, मुरांबा या मालिका बंद करायच्या ना? ही मालिका दुपारी कोण बघनार नाही”, “चांगला विषय असलेल्या मालिका दुपारी न दाखवता संध्याकाळी दाखवा” अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेच्या आतापर्यंत अनेकदा वळण मिळालंय. पण तरीही आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतं. पण आता सहा वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

Tags: Aai Aani Baba Retire Hot Aahetaai kuthe kay karteMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
 akshay mudwadkar 

"आजीला आधी माझ्यामधील स्वामी दिसले अन्…", अक्षय मुडावदकर यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, "स्वामींच्या फोटो समोर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.