Aai Aani Baba Retire Hot Aahet : छोट्या पडद्यावर अलीकडे नवनवीन विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. टेलिव्हिजन हे प्रेक्षकांसाठी सोयीस्कर व सोपे माध्यम असल्यामुळे या माध्यमातून निर्माते कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय गळून येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ व मंगेश कदम यांच्या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर नुकतीच आता या मालिकेची वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत्या २ डिसेंबरपासून प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Aai Aani Baba Retire Hot Aahet Serial)
तसेच ही मालिका दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रेक्षकांना आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतात आणि त्यानंतर एक दिवस येतो रिटायरमेंटचा…आता रिटायरमेंटनंतर दोघांची इच्छा असते गावी जाऊन राहण्याची, ही इच्छा पूर्ण होईल का? मुलांच्या व कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन हे जोडपं सुखी रिटायरमेंट आयुष्य जगू शकेल का? असं कथानक पाहायला मिळेल.
आणखी वाचा – घर बळकाण्याचा प्रयत्न, लहान मुलाला भेटू देत नाही अन्…; Bigg Boss 18 फेम हेमा शर्मावर माजी पतीचे गंभीर आरोप
स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारी २.३० वाजता आई कुठे काय करते ही मालिका दाखवली जाते. मात्र आता या वेळेत निवेदिता यांची नवीन मालिका येत असल्याने ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मागील ६ वर्षांपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता सहा वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी वाचा – 21 october Horoscope : सर्वार्थ सिद्धी योगामुळे कर्क, तूळ राशीच्या लोकांना मिळणार कामात यश, जाणून घ्या…
दरम्यान, निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत निवेदिता व मंगेश या दोन मुख्य कलाकारांबरोबर इतर कलाकार कोणते झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण लवकरच हेदेखील समोर येईल