शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन, ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर? सदस्यांनीच घेतला निर्णय

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 16, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 in the mid week eviction Avinash will be eliminated from the show see the details

Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन होणार आहे

टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. मागच्या आठवड्यात ६ ऑक्टोबर रोजी हा शो सुरू झाला. या पर्वात १९ स्पर्धक सहभागी झाले, ज्यामध्ये टीव्ही कलाकार, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी आणि वकील यांचा समावेश आहे. ‘बिग बॉस’ या शोचे नावीन्य म्हणजे या शोनध्ये रोज येणारे नवनवीन ट्विस्ट्स. या घरात रोज नवनवीन येणारे ट्विस्ट्स येतच असतात आणि यामुळे या शोला बघण्याची उत्सुकता कायम असते. अशातच आता या शोमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट म्हणजे या शोमध्ये मिड वीक एलिमिनेशन होणार आहे. (Bigg Boss 18 in the mid week eviction)

‘बिग बॉस 18’ चा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना रेशन देण्याची अट घातल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी बिग बॉस गृहस्थांना २ पर्याय देतात की, जर तुम्हाला घरात रेशन मिळवायचे असेल आणि शोमध्ये चांगले खायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला घरातील २ सदस्यांना तुरुंगात पाठवावे लागेल किंवा नॉमिनेटेड सदस्यांपैकी एकाला तुम्हाला घरातून बाहेर काढावे लागेल”. त्यामुळे आता घरातून नक्की कोण बाहेर जाणार? याविषयी अनेक चर्चा होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना हे आदेश देताच, घरातील सदस्य पहिला पर्याय निवडतात आणि दोन सदस्यांना तुरुंगात टाकण्याचा मोठा निर्णय घेतात.

Tomorrow Promo #BiggBoss18: Avinash get EVICTED from house bcz of HMs votes.pic.twitter.com/OEQyxLRMMi

— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 15, 2024

आणखी वाचा – “त्यांच्याबरोबर कधीच काम केलं नाही पण…”, संकर्षणेने सांगितल्या अतुल परचुरेंच्या जुन्या आठवणी, म्हणाला, “मैत्री जपण्याचा…”

तेव्हाच अविनाश मिश्रा म्हणतो की, “अविनाशला तुरुंगात जायला हवे आहे”. अविनाशचे म्हणणे ऐकून आरफीन काहीतरी बोलू लागतो आणि अचानक दोघांमध्ये जोरदार भांडण होते. अविनाश घरातील सर्व सदस्यांना सांगतो की एकट्याने बोलण्याची ताकद कोणाचीच नाही, मी बोलले की सगळे बाहेर येतात. त्याचवेळी स्पर्धक चुम दरांग अविनाशला शांत राहण्यास सांगते. पण अविनाश तिचंही ऐकत नाही. जेव्हा ती आरफीनला समजावून सांगू लागते तेव्हा अविनाश चुम दरांगला ओरडायला लागतो आणि मग चुम दरांगदेखील तिचा संयम गमावते आणि अविनाशला ओरडू लागते.

आणखी वाचा – लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर, उत्सुकता शिगेला

चुम दरांग आणि अविनाशच्या कडाक्याच्या भांडणानंतर, प्रत्येकजण अविनाशला घरातून बाहेर काढण्यासाठी निवडतो. दरम्यान, ‘बिग बॉस’ने अविनाशला घरातून काढून टाकले आणि त्याला बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे आता नक्की या घरातून कोण बाहेर जाणार हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss 18 in the mid week evictionbigg boss hindi 18
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actress Aishwarya Narkar received the International Iconic Awards 2024 and she shared a special post on social media.

ऐश्वर्या नारकर यांना मिळाला 'हा' आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, "कृतज्ञ..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.