सोनी वाहिनीवरील सीआयडी (CID) ही मालिका सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले. मात्र कालांतराने या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामुळे अनेक चाहते नाराज झाले. तसंच अनेकदा ही मालिका नव्याने सुरु व्हावी याबद्दल इच्छाही व्यक्त केल्या गेल्या. (CID Serial In Marathi)
सीआयडी (CID) ही मालिका आता पुन्हा एकदा सुरु होण्याची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे, कारण लवकरच सीआयडी (CID) ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी (CID) ही मालिका सुरु होणार असून नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एसीपी प्रद्युम्न, दया व अभिजीत या प्रमुख भूमिकांची झलक पाहायला मिळत आहे. इन्स्पेक्टर दया व इन्स्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न येत आहेत गुन्हेगारांना धडा शिकवायला” असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
तसंच “सत्याचा शोध घेण्यासाठी येत आहेत ए.सी.पी. प्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी’ – मराठी, फक्त सोनी मराठी वाहिनीवर, लवकरच” असं या नवीन प्रोमोखाली म्हटलं आहे. त्यामुळे साहजिकच सीआयडी (CID) ही मालिका आता मराठी भाषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, इतक्या वर्षांच्या ब्रेकनंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे अनेकांनी या नवीन प्रोमोखाली कमेंट्स करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. “भारी”, “खूप छान”, “एकच नंबर”, “आतुरता” अशा अनेक कमेंट्स करत या प्रोमोला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.
सीआयडी (CID) सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत. सीआयडी (CID) हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शोची नोंद आहे. अशातच आता हा शो मराठीमध्ये येत असल्यामुळे अनेक चाहते उत्सुक आहेत.