शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Atul Parchure Death : “खूप सहन केलंस आणि…”, अतुल परचुरेंच्या अचानक जाण्याने हळहळले मराठी कलाकार, म्हणाले, “मित्रा खूप लवकर गेलास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 8:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actors on atul parchure death

मराठी कलाकारांनी अतुल परचुरे यांना वाहिली श्रद्धांजली

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे. अतुल यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं अचानक निघून जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे. गेले दोन आठवडे अतुल यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांच्या प्राणज्योत मालवली. ऑक्टोबर २०२२मध्ये अतुल यांना कर्करोगाचं निदान झालं. मात्र त्यानंतर त्यांनी कर्करोगाला हरवण्याचा निश्चय ठाम केला. आजारपणामधून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची लढाई अपयशी ठरली आहे. (marathi actors on atul parchure death)

अतुल यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वालाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. No म्हणत सई ताम्हणकरने अतुल परचुरे यांचा फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे सुव्रत जोशी याने पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, “अतुल परचुरे सर तुम्ही किती धीराने लढलात. तुमची कला, जगण्याची प्रबळ इच्छा नेहमीच प्रेरणादायी ठरेल. पण खूप खूप वाईट वाटत आहे”.

आणखी वाचा- Atul Parchure Death : मोठा धक्का! सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

View this post on Instagram

A post shared by Atul Parchure (@atulparchure)

“अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमावल्याचं दुःख खूपच त्रासदायक आहे. त्याला आम्ही कधीच विसरु शकणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”, असं सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं आहे. तर सुप्रिया पिळगांवकर यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “लाडक्या मित्रा असं व्हायला नको होतं. खूप लढलास. खूप सहन केलंस. तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहिल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो”.

आणखी वाचा- “त्याचं जाणं आयुष्यभरासाठी दुःख”, अतुल परचुरे यांच्या निधनामुळे डगमगले अशोक सराफ, म्हणाले, “जवळचा मित्र…”

शुभांगी गोखले, अमोल कोल्हे यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याचेदेखील अनेक कलकारांनी म्हंटले आहे. ‘अलीबाबा आणि आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

Tags: atul parchureatul parchure deathsachin pilgaonkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
atul parchure wife

आजारपणामध्ये अशी होती अतुल परचुरे यांची अवस्था, पत्नीने सांगितली होती सत्य परिस्थिती, आवाजही गेला होता अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.