बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांना एकत्रित स्पॉट केले जाते. कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. तैमूर अली खान व जेह ही करीनाची दोन्ही मुलं पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तैमूर व जेहचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय असतात. (kareena kapoor son video viral)
अलीकडेच जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेह रागावलेला दिसत आहे. तो पापाराजीवर चिडलेला दिसून येत आहे. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंतीड दर्शवली आहे तर काहीनी ट्रोलदेखील केले आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये करीना तिच्या दोन मुलांसह कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. तिघं पुढे जातात तेव्हा मागून पापाराझीचा आवाज येतो आणि जेह लगेच मागे वळतो. तसेच ओरडून “आवाज करु नका” असं म्हणतो. त्यावेळी लगेचच करीना व नॅनी त्याला थांबवतात व कारमध्ये बसवतात.
जेहचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “करीना एकदाही मुलाला काहीच का बोलत नाही?”, तसेच अनेकांनी जेहचे कौतुकदेखील केले आहे.
पुढे प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला की, “दुसऱ्या मुलामध्ये अशी एनर्जी असतेच”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही दोन्ही मुलं नेहमीच रागात असतात”. तसेच अजून एकाने लिहिले की, “जेह नेहमीच मूडमध्ये असतो. मला खूप आवडतो”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा जया बच्चन यांची आठवण करुन देतो”. जेहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याआधीदेखील जेहचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि त्याबद्दलची चर्चादेखील झाली.