दक्षिण सिनेविश्वातून अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. गायत्रीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गायत्रीच्या छातीत दुखू लागल्याने रात्री उशिरा तिला हैदराबादच्या कॉर्पोरेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीचे वडील अभिनेते राजेंद्र प्रसाद चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर होते. त्याचदरम्यान गायत्रीचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं. आज हैदराबादमध्ये गायत्रीवर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. (Rajendra Prasad Daughter Gayatri Passed Away)
गायत्रीच्या जाण्यानं राजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. प्रसाद यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे. गायत्रीचं लग्न झाल्यानंतर तिच्याशी खूप दिवसांपासून बोलणं झालं नव्हतं. आमच्या दोघांमध्ये खूप चांगली बॉण्डिंग होती, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे. अभिनेता नानी, ज्युनियर एनटीआर आणि इतर सुपरस्टार्सनी सोशल मीडियावर गायत्रीच्या निधनाबद्दल भावनिक पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
నాకు అత్యంత ఆప్తులైన రాజేంద్ర ప్రసాద్ గారి కుమార్తె గాయత్రి గారి మరణం చాలా విషాదకరం. వారి ఆత్మకు శాంతి చేకూరాలని ప్రార్థిస్తున్నాను. రాజేంద్ర ప్రసాద్ గారికి మరియు కుటుంబ సభ్యులకు నా ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను.
— Jr NTR (@tarak9999) October 5, 2024
अभिनेता ज्युनियर एनटीआरने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत असं लिहिलं आहे की, “राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री ही माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या निधनाची बातमी माझ्यासाठी खूपच दु:खद आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना”. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी गायत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, “तोच जिंकावा आणि…”
दरम्यान, राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री हिने चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलेली मुलगी सई तेजस्विनीला मागे सोडले आहे. राजेंद्र प्रसाद नुकतेच ‘कल्की 2898’ मध्ये रुमीच्या भूमिकेत दिसले होते. तसंच ते ‘उत्सवम’, ‘जलेबी’, ‘वॉल्टेअर वीरैया’, ‘आला वैकुंठपुरामुलू’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसले.