सध्या सर्वत्र गणपतीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच घरात बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक टेलिव्हिजन कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांच्या घरी गणपती असल्याचे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले. अंकिताच्या घरात यावेळी उत्साहाचे वातावरण असलेले पाहायला मिळाले. तिने अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अंकिताचा उत्साह दिसून येत आहे. अशातच अंकिताचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप नाराजी दर्शवली आहे. (ankita lokhande and nia sharma dance video)
सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्याबरोबर निया शर्मादेखील दिसून येत आहे. यामध्ये दोघीही एकदम धमाल डान्स करताना दिसत आहेत. पण त्यांचा डान्स बघून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतापजनक प्रतिरकियादेखील दिल्या आहेत. गणपती पूजेच्या नावाखाली सगळा विचित्र प्रकार सुरु असल्याचेही म्हंटले आहे.
आणखी वाचा – काय असणार दीपिका पदुकोण व रणवीर सिंहच्या लेकीचं नाव? अभिनेत्याने केला होता खुलासा, पण…
या व्हिडीओवर एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हे बघून असं वाटत आहे की देवाच्या नावावर पूजा नाही तमाशा सुरु आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अंकिताचं असं वागणं पाहून विकीला २१ तोफांची सलामी द्यावीशी वाटते”, त्यानंतर अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “गल्लीतल्या मुली जशा नाचतात तशीच अंकिता नाचत आहे”. त्यानंतर सुशांतच्या आठवणीतही एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सुशांत सगळं बघत असणार”. काहींनी तर नाचून नौटंकी करत असल्याचेही म्हटलं आहे.
मात्र तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. एकाने लिहिले की, “बाप्पाच्या स्वागताला ती जर खुश असेल तर तुम्हाला काय समस्या आहेत”. तसेच अनेकांनी तिची स्तुती करत लिहिले की, “अंकिताचा चेहरा नेहमी हसतमुख असतो. तिला असं बघून खूप छान वाटतं”. दरम्यान आता अंकिताचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.