‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. टीम ए व टीम बी मध्ये फूट पडून आता बऱ्यापकी स्पर्धक एकत्र मिळून मिसळून वावरताना दिसतात. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पहिला वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेने घरात एण्ट्री केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्याने घरात प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाइल्ड कार्ड म्हणून कोण घरात येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर संग्रामच्या एण्ट्रीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
यापूर्वी मी येतोय असं म्हणत ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांना हिंट मिळाली होती. तेव्हापासून घरात कोण येणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात संग्राम चौगुले हा रांगडा गडी या वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आला आहे. संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्रामच्या एण्ट्रीआधी सूरज चव्हाणला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एखाद्या मुलीने यावं असं वाटत होतं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये Wild Card स्पर्धक म्हणून संग्राम चौगुलेची एण्ट्री, घरात प्रवेश घेताच दिली धमकी अन्…
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, “कोणतरी पोरगी आली तर मज्जा येईल”, असं लाजत सूरज म्हणतो. वैभव सूरजची ऍक्टिंग करत दाखवतो. यावर अंकिता त्याला म्हणते, “ए बाबा तू चुकीचा गेम समजतोय”. यावर सूरज लाजू लागतो. अंकिता पॅडी दादांना बोलावून घेत हा प्रकार सांगते. आणि त्याची नक्कल करते. सूरजच लाजणं पाहून अरबाज, निक्कीही त्याची फिरकी घेतात. निक्की यावर म्हणते, “त्याला मैत्रीण पाहिजे”. यावर डीपी दादा उठतात आणि म्हणतात, “आज जर पोरगी आली तर तिच्याबरोबरच प्रेम प्रकरण मी पूर्ण करुन देईन”, असा शब्द तो देतो.
आणखी वाचा – Video : गणपती विसर्जनात बेधुंद होऊन थिरकले अनंत अंबानी व राधिका मर्चंट, एकमेकांना गुलालही लावला अन्…
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल टाकताच छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार करत एण्ट्री केली. ‘बिग बॉस’च्या घरात येताच सर्व स्पर्धकांनी संग्रामच दणक्यात स्वागत केलं. त्यानंतर संग्रामने घरात येताच त्यांना धमकी दिलेली पाहायला मिळाली. “तू आता पॉवर दाखवली आहेस ती कमकुवत लोकांना दाखविली आहे. तुला आता मिळेल”, असं उत्तर देत संग्रामने धमकी दिली.