लहान पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. यामधील बालकलाकार मायरा वायकुळला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. मायराच्या निरागस अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली. त्यानंतर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्येही काम करताना दिसली. मुक्ता बर्वेच्या ‘नाच ग घुमा’ या चित्रपटांमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली होती. सोशल मीडियावरदेखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मायराची आई तिचे सोशल मीडिया हाताळते. (myra vaikul viral video)
काही महिन्यांपूर्वी ती ताई होणार असल्याचे जाहीर केले होते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने याबद्दलची माहिती दिली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी तिने आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट करत गुडन्यूज दिली होती. शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘मी मोठी ताई होणार” असे म्हंटले आहे. या फोटोंवर मायराच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.
अशातच आता तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मायराच्या आईचे खास फोटोशूट पाहायला मिळत आहे. यामध्ये मायरा स्वतः कॅमेरा हातात घेऊन फोटो काढताना दिसत आहे. तसेच आई-बाबांबरोबर पोजदेखील देत आहे. यामध्ये मायराच्या आईने केशरी रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या वडिलांनी पांढऱ्या रंगाचा सूट व जीन्स परिधान केली आहे. तसेच घरी रंगबेरंगी फुग्यांचे डेकोरेशनदेखील केलेले दिसून येत आहे. तसेच ‘वायकुळाच्या बाळाचे स्वागत’ मायरादेखील पांढरा टॉप व जीन्समध्ये गोड दिसत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
घरी लहान बाळ येण्याने मायरा खूपच खुश असलेली दिसून येत आहे. याआधीदेखील केलेल्या फोटोशूटमुळेदेखील मायरा खूप चर्चेत आली होती. तसेच मोठी ताई होणार असल्यानेदेखील ती खूप खुश होती.शेअर केलेल्या फोटोंवर अनेकजण प्रतिक्रियादेखील देत आहेत. तसेच मायराला भाऊ होणार असेही म्हणत आहेत.दरम्यान याआधी ‘नाच ग घुमा’ या चित्रपटामध्ये मोठ-मोठ्या कलाकारांबरोबर दिसून आली होती होती. यामध्ये तिच्याबरोबर स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने असे अनेक दिग्गज कलाकार होते.