Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या करणाने चर्चेत आहे. या घरात दर आठवड्याला नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सगळे सदस्य आपला खेळ दाखवू लागले आहेत. तर, दुसरीकडे खेळाशिवाय घरातील सदस्य अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी यांचे पहिल्या दिवसांपासून सूत जुळलं असल्याची चर्चा सुरू आहे. अरबाज पटेल हा आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. त्याचं खेळणं असो किंवा त्याचा राग असो. किंवा यापलिकडे त्याचं निक्कीबरोबरचे संबंध असो. कोणत्या ना कोणत्या कारणाने अरबाज कायम चर्चेत आहे. अशातच आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण त्याच्या गर्लफ्रेंडच्या पोस्टमुळे… (Bigg Boss Marathi 5 Leeza Bindra Post)
‘बिग बॉस मराठी’ सुरू झाल्यापासूनच अरबाज व निक्कीमध्ये जवळीक पाहायला मिळालेली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर घरातील सदस्यांना देखील ती जाणवलेली. निक्कीचा विषय आला की, अरबाज नेहमीच हळवा होतो. किंवा तिच्यासाठी अगदी जीव तोडून खेळतो. जेव्हा त्याला नात्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने आपण कमिटेड असल्याचं सांगितलं. अशातच आता त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी लीझा बिंद्राने अरबाजशी संबंधित पोस्ट शेअर केली आहे.
लीझा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोअर्सही आहेत. अशातच लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अरबाजचा उल्लेख करत एक विनंती केली आहे. लीझाने स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने लिहिलं आहे की, “कृपया मला अरबाजबद्दल मॅसेज किंवा कमेंट करु नका”.
अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर लीझाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते अरबाज व निक्की यांचा उल्लेख करत कमेंट्स करायचे. यापैकी नेटकऱ्यांच्या काही कमेंट्सना लीझा उत्तरंदेखील द्यायची. पण आता अरबाजसंदर्भात मला मॅसेज किंवा कमेंट करु नका असं म्हटलं आहे. त्यामुळे आता निक्कीमुळे अरबाज व लीझाचा यांकया नात्यात काही दुरावा येणार का? की ते त्यांचं नातं संपवणार? अशा चर्चा होत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या मागील आठवड्यात जोडीचा मामला होता. ‘बिग बॉस’ने घरात जोड्या पाडल्या होत्या. निक्की आणि अभिजीतची एक जोडी होती. दोन जणांना 10 सदस्य टार्गेट करताना दिसून आले. अरबाजने निक्कीविरोधात बोलायला सुरुवात केली आणि दुष्मन का दुष्मन दोस्त म्हणत अरबाज सर्वांनाच आवडू लागला.