रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरातील नव्या पाहुण्यासाठी मायरा वायकुळ उत्सुक, आईच्या प्रेग्नन्सी फोटोशूटमध्ये धमाल अन्…; व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 2, 2024 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
myra vaikul viral video

मायरा वायकुळचे आईबरोबर खास फोटोशूट

लहान पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. यामधील बालकलाकार मायरा वायकुळला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. मायराच्या निरागस अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घातली. त्यानंतर ती अनेक हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्येही काम करताना दिसली. मुक्ता बर्वेच्या ‘नाच ग घुमा’ या चित्रपटांमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली होती. सोशल मीडियावरदेखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मायराची आई तिचे सोशल मीडिया हाताळते. (myra vaikul viral video)

काही महिन्यांपूर्वी ती ताई होणार असल्याचे जाहीर केले होते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने याबद्दलची माहिती दिली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी तिने आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट करत गुडन्यूज दिली होती. शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘मी मोठी ताई होणार” असे म्हंटले आहे. या फोटोंवर मायराच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “गद्दार, खेळाचा समज नाही अन्…”, एकमेकांना सदस्यांनी केलं नॉमिनेट, डीपीवर छोटी पुढारी भडकला आणि…

View this post on Instagram

A post shared by Pooja RK – Certified Newborn Photographer ???? (@navi_mumbai_props_studio)

अशातच आता तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मायराच्या आईचे खास फोटोशूट पाहायला मिळत आहे. यामध्ये मायरा स्वतः कॅमेरा हातात घेऊन फोटो काढताना दिसत आहे. तसेच आई-बाबांबरोबर पोजदेखील देत आहे. यामध्ये मायराच्या आईने केशरी रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिच्या वडिलांनी पांढऱ्या रंगाचा सूट व जीन्स परिधान केली आहे. तसेच घरी रंगबेरंगी फुग्यांचे डेकोरेशनदेखील केलेले दिसून येत आहे. तसेच ‘वायकुळाच्या बाळाचे स्वागत’ मायरादेखील पांढरा टॉप व जीन्समध्ये गोड दिसत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मला अरबाजविषयी विचारणं…”, अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मला मॅसेज करुन…”

घरी लहान बाळ येण्याने मायरा खूपच खुश असलेली दिसून येत आहे. याआधीदेखील केलेल्या फोटोशूटमुळेदेखील मायरा खूप चर्चेत आली होती. तसेच मोठी ताई होणार असल्यानेदेखील ती खूप खुश होती.शेअर केलेल्या फोटोंवर अनेकजण प्रतिक्रियादेखील देत आहेत. तसेच मायराला भाऊ होणार असेही म्हणत आहेत.दरम्यान याआधी ‘नाच ग घुमा’ या चित्रपटामध्ये मोठ-मोठ्या कलाकारांबरोबर दिसून आली होती होती. यामध्ये तिच्याबरोबर स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने असे अनेक दिग्गज कलाकार होते.

Tags: marathi serialmyra vaikulphotoshoot
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aai Aani Baba Retire Hot Aahet Star Pravah channel new serial Netizens expressed their displeasurement

“आई आणि बाबा रिटायर होत आहेत” निवेदिता सराफांची नवी मालिका, प्रेक्षक म्हणाले, “नवीन असावरी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.