वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता, संवेदनशील लेखक, गीतकार, निर्माता अशी जितेंद्र जोशीची ओळख. पण ही ओळख मिळवण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासात त्याच्याबरोबर कायम असणारी एक व्यक्ती म्हणजे त्याची आई. म्हणूनच तो जितेंद्र शकुंतला जोशी असं नाव लावतो. त्याच्या आयुष्यात, मनात आईविषयी असलेल्या भावना त्यानं रविवारी असलेल्या ‘मदर्स डे’च्या निमित्तानं “मटा” ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या.(Jitendra Joshi Post)
मुलाखतीत त्याने सांगितलं की “मी जितेंद्र शकुंतला जोशी… डॉक्टर, वकील किंवा एखादी पदवी मिळाल्यानंतर माणूस अभिमानानं आपल्या नावाबरोबर ती पदवी जोडतो. पद्मश्री, पद्मभूषणचा सन्मान मिळाल्यावर ती ओळख व्यक्तीच्या नावाबरोबर जोडली जाते. आज माझी जी काही ओळख आहे ती ज्या व्यक्तीमुळे आहे ती म्हणजे माझी आई. ‘शकुंतला’ हे तिचं नाव माझ्या नावाबरोबर एखाद्या पदवीसारखं असावं आणि ते तसंच कायम राहावं म्हणून मी माझं नाव आता ‘जितेंद्र शकुंतला’ असं सांगतो किंवा लिहितो” मदर्स डे च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की “मुळात ही ‘मदर्स डे ‘ची संकल्पना पाश्चिमात्य देशांची आहे. सर्वसाधारणपणे तेथील मुलं आपल्या आई-वडिलांपासून लांब वेगळं राहतात. त्यामुळे आपल्या आईला भेटता यावं, तिच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून हा दिवस साजरा करत असतील.
पाहा आईबद्दल काय म्हणाला जितेंद्र जोशी (Jitendra Joshi Post)
पण, आपली परंपरा, संस्कृती वेगळी आहे. आपण आईला देवता मानणारी माणसं आहोत. माझ्या बाबतीत तर ते अक्षरशः खरं आहे. एक तर तिनं मला जन्म दिला; एकटीनं संगोपन केलं, पालनपोषण केलं, वाढवलं. आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका तिनं एकटीने माझ्या आयुष्यात निभावल्या त्यामुळे ती माझ्यासाठी देवच आहे.. मी लहान असताना माझे वडील दारू प्यायचे त्यामुळे आई त्यांच्यापासन वेगळी झाली आणि आम्ही माझ्या आजोळी राहायला लागलो. तिथे ती इतरांच्या घरची कामं, शिवनकाम करून दिवसरात्र काम करून पाच पन्नास रूपये कमवत तिने घर आणि मला सांभाळलं, तिने कधीही स्वत: पूर्ता विचार केला नाही तिने ज्या परिस्थितीत दिवस काढले तसं जर माझ्या वाट्याला आलं असतं तर मी कदाचित आयूष्य संपवल असतं पण ती माझ्याकडे बघून जगत राहिली, तिला शक्य होइल ते सगळं तिने मला देण्याचा प्रयत्न केला.(Jitendra Joshi Post)
हे देखील वाचा – ‘पॉर्न बघणाऱ्यांनी फॅमिली शो…’चाहत्याच्या कमेंटवर भडकला पृथ्वीक
प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या जितेंद्र जोशीला कलेची आवड निर्माण झाली ती त्याच्या आईमुळे. जितेंद्र जोशी मुलाखतीत सांगतो की “काही वर्षांनी आजी-आजोबांचं घर सोडून मी आणि आईने पुण्यात भाड्यानं छोटं घर घेतलं. त्यावेळी मला काहीतरी करण्यासाठी, काम मिळवण्यासाठी मुंबईला यायचं होतं. तेव्हा तिनं मला थांबवलं नाही. स्वतः एकटी राहून मला मुंबईला पाठवलं. आईमुळेच मला सिनेमांची गोडी लागली. तिला सिनेमाची गाणी, त्याच्या गोष्टी पाठ असायच्या. तिचं ‘स्टोरी टेलिंग’ खूप छान असतं. मी लहान असताना तिनं मला अनेक सिनेमे थिएटरमध्ये नेऊन दाखवले आहेत. ती घरात गुणगुणायची; म्हणूनच कदाचित माझा ओढा कविता, सिनेमांकडे असावा. व्यक्त होण्याचा गुण मला माझ्या आईकडून मिळाला. तिच्यामुळेच मी इतका संवेदनशील झालोय. दोन स्पेशल नाटकाच्या निर्मीतीदरम्यान जाणवली होती पैश्याची चणचण मराठी नाटकं, सिनेमे हे अनेकदा आर्थिक परिस्थितीचा अभाव असल्याने पेचात सापडतात.(Jitendra Joshi Post)
बऱ्याचद तर निर्माते मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने निर्मिती करण्यास त्यार होत नाहीत. मात्र तरीसुध्दा प्रेक्षकांपर्यंत आपली कलाकृती पोहचवी आणि त्यांच मनोरंजन करता यावं यासाठी अनेक कलाकार,दिग्दर्शक पुढाकार घेताना दिसत असताता. जितेंद्र जोशी हा त्यांच्यातलाच एक. मुलाखतीत आईच्या गुणांबद्दल बोलत असताना त्याने सांगितलं की ” आईचा एक गुण मात्र माझ्यात कधीच आला नाही… पैसे साठवणं आणि त्याची बचत करणं. हे काम तिला अचूकपणे जमायचं. मला ते अजिबात जमलं नाही. काही वर्षांपूर्वी ‘दोन स्पेशल’ नाटकाच्या निर्मितीसाठी मी घरात उरलेले थोडे फार पैसे वापरले. तेव्हा ती म्हणाली होती की, घरात शिल्लक असलेले शेवटचे पैसे आहेत. पण तिनं मला माझ्या कामात कधीच थांबवलं नाही. जेव्हा तिनं ‘दोन स्पेशल’ नाटक पाहिलं तेव्हा तिला विश्वास बसला की, मुलाने पैसे योग्य ठिकाणी गुंतवले आहेत. ‘गोदावरी’ सिनेमाच्या निर्मितीसाठीही असाच प्रसंग घडला होता. त्यावेळीही तिनं अडवलं नाही
