मराठी चित्रपट आणि विनोद म्हटलं की अशोक सराफ यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. विनोदाचं अचूक टायमिंग आणि आपल्या उत्तम अभिनयशैलीने आजवर अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीतला एक काळ चांगलाच गाजवला. चित्रपटसृष्टीतील कित्येक वर्षे अशोक मामांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवून घालवली. अशोक मामांच्या पांडू हवालदार चित्रपटातील सखाराम हवालदार या भूमिकेने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या घरात मामा पोहोचले. मामांना या काळात साथ लाभली ती अभिनेत्री रंजना यांची. रंजना यांच्या सोबत मामांनी चित्रपटसृष्टीतला एक काळ चांगलाच गाजवला. (Ashok Saraf Ranjana Deshmukh)
अशोक मामा आणि रंजना यांचे एकत्र चित्रपट चांगलेच गाजले. चित्रपटसृष्टीत एकत्र काम करतानाच त्यांचे प्रेम जुळून आले, याबद्दल त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक सहकलाकारांनी बरेचदा भाष्य केले आहे. त्यांनतर रंजना यांच्या अपघातानंतर त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास तिथेच ठप्प झाला. अशोक सराफ यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी प्रथमच रंजनाबद्दलच्या काही खास आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
पाहा काय म्हणाले अशोक मामा रंजना यांच्याबद्दल (Ashok Saraf Ranjana Deshmukh)
अशोक सराफ यांनी रंजना बाबत मुलाखतीत बोलत असताना म्हटलं की, ‘ रंजना जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीत आली तेव्हा तिने विनोदी भूमिका केल्याच नाहीत. गंभीर भूमिकांमुळे रंजनाला आघाडीची नायिका म्हणून आधीच प्रसिद्धी मिळाली होती. माझ्यासोबतच तिने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या या भूमिकांचे त्यावेळी मोठं कौतुक होत होत. याबाबतीत अगदी माझ्यापेक्षाही ती वरचढ ठरत होती. ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ असेही बोलले जायचे. (Ashok Saraf Ranjana Deshmukh)
हे देखील वाचा – ‘मी खूप हट्टी होतो’ लता दीदींचही ऐकलं नाही म्हणत महेश कोठारेंनी सांगितला तो किस्सा
हे ऐकून मलाही माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटायचं कारण त्यावेळी ती एक नटी म्हणून सरस आहे यावर मी शिक्कामोर्तब केला होता. ती कुठलीही भूमिका तितक्याच ताकदीने उभी करू शकते यावर माझा विश्वास होता. त्यामुळे ती माझ्यापेक्षा सरस ठरली तरी मी या मैत्रिणीसाठी आनंदी असायचो. रंजना व्यतिरिक्त मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही, तिच्यासारखी तीच’. असं म्हणत अशोक सराफ यांनी रंजनामध्ये दडलेल्या कलाकाराचे तोंडभरून कौतुक केलं.
अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी सिनेसृष्टीत नावाजलेल्या जोड्यांपैकी एक होती यांची बरीच उदाहरण आहेत.