का छोट्याश्या गोष्टीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा “बटरफ्लाय”!!

Butterfly New Marathi Movie
Butterfly New Marathi Movie

मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर चित्रपट येत असतात. सामान्य होममेकरच्या जीवनावर आधारित असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन आणि मीरा वेलणकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.(Butterfly New Marathi Movie)

प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येते. विशेषत: ज्या स्त्रिया कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करतात, त्या स्वतःची ओळख पूर्णपणे गमावून बसतात. यासर्व गोष्टींमध्ये आयुष्यात अशी एक घटना घडते ज्याने आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळते .बटरफ्लाय म्हणजे पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने झटणाऱ्या स्त्रीचा मनोरंजक प्रवास हे “बटरफ्लाय” या चित्रपटाचं कथासूत्र आहे.

असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी “बटरफ्लाय” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.(Butterfly New Marathi Movie)

सकस लेखन, उत्तम अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या चित्रपटाच्या टीजरनं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. प्रत्येक घरातल्या होममेकरला आपलीशी वाटणारी ही गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहणं हा वेगळा अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sulochana Latkar Real Name
Read More

हे होत सुलोचना याचं खर नावं वाचा काय आहे सुलोचना दीदी यांच्या खऱ्या नावाचा किस्सा

   सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दिवाण. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि कोल्हापूर काही  चित्रपटात नगण्य…
(Tejashree Pradhan Subodh Bhave)
Read More

‘हॅशटॅग तदेव लग्नम’मध्ये झळकणार सुबोध भावे – तेजश्री प्रधान

काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे हे परदेशात दिसत होते. पण त्यांचं तिथे असण्याचं कारण…
Get Together Upcoming Movie
Read More

“गेट टूगेदर” या चित्रपटात पाहायला मिळणार पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट- देवमाणूस फेम एकनाथ गीतेची मुख्य भूमिका

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग…
Khillar New Marathi Movie
Read More

रुपेरी पडद्यावर रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार रिंकू आणि ललितचा नवीन चित्रपट, मकरंद माने करणार दिग्दर्शन

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. अनेक वेळा प्रेक्षकांनी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांच्याकडे बैलगाडा…
Chaouk Marathi Movie Teaser
Read More

कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’

सध्या मराठी चित्रपटांच्या रांगाच लागल्यात. रोमँटिक, आशयघन चित्रपटांची चलती असताना एका वेगळ्याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या…
New marathi movie
Read More

आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचं मोठ्या पडद्यावर आगमन लेखक म्हणून पार पडणार महत्वाची भूमिका

कोणत्याही कलाकाराच्या एखाद्या चित्रपटातील, मालिकेतील भूमिकेवरून त्याच्या कलेची तुलना करणं हे चुकीचं असत कारण एखादा कलाकार हा कोणत्याही…