शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपती व त्याची खरी आई समोरासमोर, स्वीकार करणार का?, भूवनेश्वरीची नवी खेळी की आणखी काही?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 20, 2024 | 3:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada new promo Adhipati and Charulata meet each other

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत चारुलता व अधिपती पहिल्यांदाच एकमेकांसमोर, आई म्हणून स्वीकार करणार का? नव्या ट्विस्टने वेधलं लक्ष

Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये गेले काही दिवस नवनवीन ट्विस्ट येतं आहेत आणि हे नवीन ट्विस्ट प्रेक्षकांनाही आवडत आहेत. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत आतापर्यंत अक्षरा व अधिपती हनिमूनसाठी फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील व भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात. जेव्हा अधिपती व अक्षरा घरी परत येतात, त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते. ते भुवनेश्वरीला सगळीकडे शोधतात पण ती त्यांना सापडत नाही. हे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)

अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बाजारात अक्षराला एक बाई दिसते, ओळखीची वाटल्याने आणि भुवनेश्वरीच असू शकते या विचाराने ती तिचा पाठलाग करते. समोर आलेल्या बाईला ती भुवनेश्वरी समजत असते. पण समोरची महिला तुमचा काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणते. मी भुवनेश्वरी नसून चारुलता आहे, अशी ओळख ती सांगते. यानंतर त्या चारुलताने सूर्यवंशींच्या घरी प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात चारुलता व अधिपती एकमेकांसमोर आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीने खरेदी केली महागडी कार, कुटुंबियांबरोबर पूजा आणि जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

नुकताच या नवीन ट्विस्टचा प्रोमो झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमधून माय-लेकाची भेट होणार का? असं दिसून येत आहे. या नवीन प्रोमोमध्ये चारुलता व अधिपती एकमेकांसमोर आले असून चारुलता अधिपतीला आवाज देते. यानंतर अधिपती चारुलता व अधिपती एकमेकांकडे बघून हसतात. चारुलताला बघून अधिपतीला आनंद होतो तर अधिपतीही चारुलताला बघून हसतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बायकांना हाडतुड करणारे मर्द पुरुष…”, निक्कीवर आवाज चढवून बोलला अरबाज, मराठी अभिनेता म्हणतो, “इतरांनी बोला कारण…”

मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसंच या नवीन ट्विस्टमुळे आता मालिकेच्या कथानकाविषयी उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन काय ट्विस्ट येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? अधिपती चारुलताला आपली आई  म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे.           

Tags: marathi serialMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Horror movies

ओटीटीवरील 'हे' हॉरर चित्रपट चुकूनही पाहू नका, पण यामध्ये नक्की काय आहे?, धक्का बसेल कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.