शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने सुसंस्कृत म्हटलं पण सूरजने ‘त्या’ कृतीमधून केलं सिद्ध, अभिनेत्रीने राखी बांधताच पाया पडला अन्…; महाराष्ट्राला कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan appreciated for take blessings of reel sister video viral on social media

Bigg Boss Marathi 5 Reel बहिणीने राखी बांधताच पाया पडला सूरज चव्हाण, संस्कारांचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की वादविवाद, भांडण हे आलंच. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सुरुवातचं अनेक भांडणांनी व वादांनी झाली. हे पर्व चर्चेत राहण्याचं कारणचं या घरातील भांडणं व वाद आहेत. घरात कोणतेही टास्क आले की स्पर्धक सदस्यांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे आपापल्या आवडत्या कलाकारांना वाचवण्यासाठी बाहेर प्रेक्षकांमध्येही खडा जंगी सुरू होते. हे पर्व सुरु झाल्यापासून या गहरात अनेक भांडण व वाद पाहायला मिळत आहेत. मात्र या भांडण व वादात काल एका प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. आज सर्वत्र रक्षाबंधननिमित्त आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातही काल रक्षाबंधन झाले. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)

रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर कलर्स मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका अबीर गुलालची टीम पाहुणी म्हणून आली होती. विशेष म्हणजे यातील दोन पाहुणे हे या घरचे आधीच्या सीझन मधील स्पर्धक होते, त्यामुळे या भागाला आणखीनच रंगत आली. या भागात आणखी एक रंजक घटना पाहायला मिळाली ती म्हणजे ‘अबीर गुलाल’ या मालिकेतील श्री म्हणजेच अभिनेत्री पायल जाधवने सूरज चव्हाणला राखी बांधली. राखी बांधत असताना पायल त्याला “तुझा खूप अभिमान वाटतो” असं म्हणते हे ऐकून त्याला अगदीच गहिवरून येतं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पुढे पायल त्याला “आसपास रक्षाबंधन आहे” असं म्हणत असतानाच सूरज तिला राखी बांधण्यासाठी हात पुढे करतो आणि तिच्याकडून राखी बांधून घेतो. तसंच तो तिला आपली बहीण मानत पायाही पडतो. त्याच्या या साध्या कृतीवर घरातील सर्व सदस्य अवाक होत त्याचं कौतुक करतात. त्याच्या या छोट्याश्या कृतीने तो अनेकांची मनं जिंकतो. अचानक मिळणारी बहिणीची माया पाहून यावेळी सुरजही खूप भावुक झालेला पाहायला मिळालं.

आणखी वाचा – Chhaava Movie Teaser : ‘छावा’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, विकी कौशलने जिंकलं प्रेक्षकांचं मन, काही मिनिटांतच हजारो व्ह्युज

सूरजची ही कृती घरातील सदस्यांबरोबरचं अनेक चाहत्यांनाही भावली आहे आणि त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “राखी बांधली तर मोठ्या बहिणीच्या पाया पडला. याला म्हणतात सुसंस्कृतपणा”, “आपण संस्कार विसरलोय, सुरजसाठी हे नॉर्मल आहे”, “आपले संस्कार महाराष्ट्राला दाखवणारा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणजे सूरज”, “नुसतं रक्षाबंधन ऐकलं आणि सूरजने हात पुढे केला”, “सूरजशिवाय ‘बिगबॉस’ नाही”, “सूरज नसता तर मराठी माणसाने ‘बिग बॉस’ बघितलंच नसतं”, “आम्ही फक्त सुरज मुळे ‘बिग बॉस’ बघतो”, “सुरज शेवटपर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात पाहिजे, सूरजकडून महाराष्ट्र खूप काही शिकतोय”.   

आणखी वाचा – नवऱ्यासह परदेशात राहणारी पूजा सावंत रक्षाबंधनला भावुक, म्हणाली, “मी तुमच्याबरोबर नाही आणि…”

काही दिवसांपूर्वीच सुरज चव्हाणला त्याच्या बहिणीची आठवण सतावत होती. आई वडील गेल्यावर मोठ्या बहिणीनेच मायेची सावली दिल्याचे त्याने शोमध्ये कबूल केले होते. यावेळच्या रक्षाबंधनला बहिणीकडून राखी बांधता येणार नाही याचे दुःख त्याला सतावत होते. मात्र त्याला पायलच्या रूपात आणखी एक बहीण मिळाल्याने तो गहिवरुन जातो.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 NewsSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo daily update truth of the contestants will judged in the house

Bigg Boss Marathi : "ये शेंबडी, चल हट", निक्की-जान्हवीची घरात पुन्हा दादागिरी, दोघींचा तोच अवतार पाहून प्रेक्षक म्हणाले, "यांचा माज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.