बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळालं आहे. मात्र पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अनुष्का मनोरंजन विश्वापासून दूर झालेली पाहायला मिळते. पण सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती मनातील अनेक विचार सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या देशात सर्वत्र कोलकातामध्ये घडलेल्या बलात्कार व हत्येसंदर्भात संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. यामध्ये अनुष्काच्या सोशल मीडियावरील पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Anushka Sharma on rape cases)
अनुष्का अनेकदा जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांवर खुलेपणाने भाष्य करताना दिसते. नुकतीच तिने कोलकातामध्ये शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार व हत्येची घटना घडली त्याला आता सडेतोड उत्तर दिले आहे. अनुष्काने भारतात घडलेल्या बलात्कार संबंधित घटनांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे. यांमध्यूए आजवर बलात्कारासारखे गंभीर प्रकारावर भाष्य करताना दिसत आहे. या लिस्टमध्ये केवळ कोलकाता येथील बलात्कार व हत्येचा सहभाग नसून इतर वयोगटातील महिलांबरोबर काय घडलं आहे? हे दाखवण्यात आले आहे.

अनुष्काने जी लिस्ट शेअर केली आहे त्यामध्ये दिल्लीतील दोन वर्षांच्या मुलीपासून उत्तर प्रदेशमधील 85 वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा समावेश आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सुमारे ३.७ मिलियनपेक्षा अधिक वेळा शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “अजूनही तिचीच चूक आहे का?”.
पुढे तिने विचारले की, “यावेळी कोणतं कारण आहे? की यावेळी देखील तिची चूक आहे. कारण पुरुष तर पुरुषच राहणार आहे”. अनुष्काच्या या पोस्टवरुन महिलांच्या बाजूने उभी राहणारी ती महिला असल्याचे दिसून येत आहे. करीना कपूरपासून आलिया भट्ट, हृतिक रोशन तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. या सगळ्यांनी सोशल मीडियावर आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अनुष्काने विराटबरोबर लग्न केले. सध्या ती तिच्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये स्थायिक झाली आहे. लवकरच तिचा महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘छाकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.