शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका चोप्राच्या लेकीचं वडिलांबरोबर आहे खास बॉंडिंग, बाबांचा नवा हेअरकटही केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 13, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priyanaka chopra daughter video

प्रियांका चोप्राच्या लेकीने निक जोनासचा केला हेअरकट

 बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याचप्रमाणे हॉलिवूडमध्येही स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच तिचे वैयक्तिक आयुष्यदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेले पाहायला मिळते. २०१८ साली ती अमेरिकन पॉपस्टार निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांच्या वयातील अंतरामुळे तिला खूप ट्रोलदेखील केले गेले. त्यानंतर सरोगसी पद्धतीने एका मुलीचे आई-वडील झाले. मुलीचे नाव त्यांनी मालती मेरी असे ठेवले. मुलीचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती शेअर करत असते. (priyanaka chopra daughter video)

प्रियांकाप्रमाणेच निकदेखील स्वतःच्या अकाऊंटवरुन मुलगी मालतीचे फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये मालती निकचा हेअर कट करताना दिसत आहे. तसेच बोबडे बोलदेखील ऐकायला मिळत आहेत. तसेच निकदेखील लेकीचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – Tharala Tar Mag Serial :  प्रतिमाची स्मृती परत येणार का?, तन्वीची अस्वस्थताही वाढली अन्…; खरं सत्य येणार का समोर?

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

सध्या प्रियंका तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’ व ‘हेड्स ऑफ स्टेट’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकताच निक ऑस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्टमध्ये पत्नी व मुलगी मालतीला भेटण्यासाठी गेला होता आणि त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवला. प्रियंकाने देखील काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिघंही मजा-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच तिने चित्रपटाच्या सेटवरीलदेखील काही फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Munawar Faruqui : “कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण…”, कोकणी माणसाला शिवी व खिल्ली उडवल्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, म्हणाला, “त्यावेळी मला…”

त्याचप्रमाणे तिने कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या शेड्यूल संपण्याचीदेखील घोषणा केली आहे. तिने “‘द ब्लफ’ च्या चित्रपटाचे शेड्यूल संपले. हे करताना माझे कुटुंबं माझ्याबरोबर आहे आणि हे सर्व शक्य करण्यासाठी चांगल्या लोकांची मला साथ मिळाली ही अभिमानाची गोष्ट आहे”, असे लिहिले आहे.

Tags: daughternick jonaspriyanka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Yogita Chavan demand to leave the show know more

घरी जाण्यासाठी योगिताचा Bigg Boss कडे हट्ट, शोमधील त्रास अभिनेत्रीला सहन होईना, एक्झिट घेणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.