रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे कलाकारही त्रस्त, आता सुबोध भावेनेही दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, “या ट्राफिकमुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 7, 2024 | 12:38 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Subodh Bhave stuck in traffic

सुबोध भावेची ट्राफिकच्या बाबतीत नाराजीची पोस्ट

Subodh Bhave stuck in traffic : मराठी अभिनेता सुबोध भावे हा नेहमी चर्चेत राहणारा अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तो ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळत आहे. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेलाही पाहायला मिळतो. त्याची अनेक सडेतोड मतं तो सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करताना दिसतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.

सुबोधने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो घोडबंदर रोड येथे ट्राफिकमध्ये अडकलेला दिसत आहे. मुंबईमध्ये सध्या ट्राफिकची समस्या अधिक असलेली दिसून येत आहे. याबद्दल आधीही अनेक मराठी कलाकारांनी व्हिडीओ शेअर करत करत संताप व्यक्त केला होता. सुबोधने देखील व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “ट्राफिकमुळे आज ९ चा एपिसोड पण १० वाजता सुरु होईल वाटतं”,असं लिहिलं आहे. सुबोधच्या या व्हिडीओ व कॅप्शनमुळे उपहासात्मक टिका केल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा – Tharal Tar Mag Serial : सायली तन्वीच्या लढाईत अर्जुनची तारांबळ, प्रतिमाच्या डेड बॉडी प्रकरणाचा रविराज घेणार शोध?

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

सुबोधने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली असून अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हंटले की, “लवकर निघायचे ना घरातून जरा”, दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहीले की, “आम्ही वाट पाहू”. दरम्यान यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या मालिकेचे कौतुकदेखील केले. तसेच या मालिकेतील भूमिकादेखील आवडत असल्याचेही म्हंटले आहे.

आणखी वाचा – “मी त्यांना कधीही भेटले नाही कारण…”, नवऱ्याच्या पहिल्या पत्नीबाबत करीना कपूरचं मोठं भाष्य, म्हणाली, “मी तिची…”

याआधी अभिनेता शशांक केतकर व ऐश्वर्या नारकर यांनीदेखील ट्राफिकच्या समस्येवर संतापजनक पोस्ट शेअर केली होती. दोघांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्याही समस्या शेअर केल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईतील ट्राफिक ही एक मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी असेही जनता म्हणत आहे.

Tags: instagram postsubodh bhavetraffic jam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dalljiet Kaur on Nikhil Patel shared emotional post

"प्रेम, विश्वास काही नसतं…", दुसऱ्यांदा लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, म्हणाली, "मी आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.